Saturday, June 5, 2021

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,
आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.
थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.
शारीरिकदृष्ट्या थकलो आहे आणि मानसिकदृष्ट्या जास्त खचलोय हो !
रुग्ण आणि नातेवाईक जीवाच्या आकांताने रुग्णालयात भरतीसाठी विणवण्या करतात. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती फोन करतात. दिवसभरात 500 कॉल उचलत असू. काय करणार हो?
बेडच्या मर्यादा आहेत. जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांनाही पूर्ण बरे केले पाहिजे. ऑक्सिजन बेड आहेत, काही व्हेंटिलेटर आहेत पण ऑक्सिजन नाहीये . कस सांगू रुग्णांना आणि नातेवाईकांना की ऑक्सिजन संपलाय. आमच्या डोळ्यादेखत रुग्ण ऑक्सिजन अभावी मरत आहेत हो. आमच्या अश्रूंचा बांध आता फुटतोय. आम्ही पण माणूसच आहोत की.
2-3 तास झोपावे लागते पण तीसुद्धा झोप नाही मिळत. बीपी, शुगर ने आम्ही पण घेरलोय. दररोज औषध घेऊन झोपतोय.
रुग्णसेवा करताना 2-3 वेळा तर आम्हाला पण कोरोना होऊन गेलाय. अजून अशक्तपणा आणि खोकला आहे. आमच्या येथील आरोग्य कर्मचारी एक-एक करून कोरोनाची शिकार होत आहेत.
इंजेक्शन पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीयेत. 2-3 दिवसात स्कोर एवढा वाढतो की गरज नसलेल्या रुग्णाला सुद्धा अचानक इंजेक्शन्स लागतात. आयसीयू चे मॅनेजमेंट, आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रश्‍न, त्यांचे आरोग्य, ऑक्सिजन-इंजेक्शन पुरवठा, अँबुलन्स, नातेवाईकांचे फोन सगळं आम्हीच करतोय हो दादा !
काही नातेवाईक तर रुग्ण एकदा दवाखान्यात सोडून गेले की परत येत पण नाहीत त्यांच्या जेवनाचं आणि कधी नाईलाजाने अंत्यसंस्कारच पण आम्हीच बघतोय हो. आमच्या कुटुंबात गेली दीड वर्षे झाले शांतता नाहीये. ही सगळी अराजकता बघितली तर अस वाटत हॉस्पिटल बंद करून लांब निघून जावं पण नाही हो,
नाही करता येत तस.
त्या किंचाळणार्‍या माऊलींचे चेहरे समोर आले की अंगावर शहारे येतात आणि परत सेवेला बिलगावे लागते.
आमच्या काही माफक अपेक्षा आहेत तुमच्याकडून. आम्ही 24 तास तुमच्या सेवेत आहोत.
पण नका करू हो सोशल मीडियावर आमची बदनामी.
रुग्ण वाचवल्यावर तुम्ही धन्यवाद द्यायला नाही आलात तरी चालेल पण रुग्ण गेल्यावर हॉस्पिटलची नका करू हो तोडफोड.
अवाजवी बिले फाडतो, कोरोना नाहीये-डॉक्टर घाबरवतात अस नका हो बोलू. आमचे पण आई-वडील, काका, मामा, नातेवाईक कोरोनाग्रस्त झाले आहेत.
रुग्ण गेला म्हणून काही गिधाड या संकटकाळातही आम्हाला ब्लॅकमेल करतात; नका करू हो.
100 पैकी 2 डॉक्टर कदाचित चुकीचे वागत असतील पण त्यासाठी 98 डॉक्टरांना गृहीत नका हो धरू. आम्हाला मानसिक आधाराची गरज आहे.
या काळात तुम्हाला जी मदत करता येईल ती मात्र नक्की करा.

प्लासमा डोनर बघा. ऑक्सिजन साठी तुम्हाला किंवा संघटनांना काही करता आलं तर ते करा.
आणि विशेष महत्वाचं….
नका हो बाहेर पडू, नका गर्दी करू, नका राजकीय मेळावे घेऊ, नका आंदोलन करू, दिवाळी सारखी खरेदी नका करू. अडाणी गरीब लोकांना मदत करा. आमच्यापर्यंत पोहोचवा. कोरोनाची लक्षणे दिसली तर अजिबात घरी थांबू नका. प्राथमिक उपचार घ्या. मनाने घाबरू नका. आमची मदत घ्या. गोळ्यांवर बर्‍या होणार्‍या आजारासाठी का ऑक्सिजन बेड शोधता तुम्ही?

मला पुढच्या रुग्णाला तपासायला जायचंय.
एवढं ऐकणार ना तुम्ही? तुमच्या व आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी!!

शब्दांकन – सुदीप किसन हासे,
संचालक, दै. युवावार्ता (मोबा. 7720046005)

5 प्रतिक्रिया

  1. हो आपले बरोबर आहे. मी आपल्या सेवेला वंदन करतो . मी उद्या आपल्या या सेवेला सलाम करण्यासाठी व्यंगचित्र प्रसिध्द करत आहे

  2. खर बघीतले तर नागरिक म्हणून आपली सर्वात पहिली जबाबदारी आहे की गरज नसताना बाहेर फिरणे टाळणे,
    आवश्यक कामासाठी गेलो तर मास वापरणे.छोटी पण बेसिक गोष्टी आहेत आपल्याला सेफ ठेउ शकता.
    आणि अजूनही आपले बरेच बांधव अंगावर दुखणे काढता व नंतर बेडसाठी धावपळ करता.
    थोडी शी काळजी घ्यावी जेणेकरून आपण सर्व सुरक्षित असू.

  3. देवाला प्रत्येक ठिकानी मद्तिला येता येइना, म्हणून डॉक्टर व मेडिकल स्टाफ ला त्यान पाठवलय, तसेच अनेक चांगल्या विचाराने इतरानामदत कर नारया अनाम बंधू बघिनी आपल्या कार्याला सलाम

  4. Service to mankind is service to God.So don’t be nervous. God has always been loyal to you. This kind of device is given to you by God. So don’t get discouraged, accept the truth and go ahead as usual. Soldiers/warriors die many times before death,but still they go ahead. You are also covid warriors.So best of luck, accept the truth and keep it up as usual.God bless you. Jay Jay Ram Krishna Hari. With due respect to you.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कोरोना नियम पाळा – घरपट्टी टाळा ; मंगळापूरच्या सरपंच व उपसरपंचाचे कोरोनामुक्तीसाठी प्रभावी पाऊल

संगमनेर (प्रतिनिधी)मागील काही दिवसामध्ये संगमनेर तालुक्यात कोरोना बाधीताच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत होती. ग्रामीण भागातील 16 हजार...

ट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा

वारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...

माझी वसुंधरा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे घवघवीत यश ; नगरपंचायत गटात शिर्डी राज्यात सर्वप्रथम तर कर्जत द्वितीय : मिरजगाव, लोणी बु. ग्रामपंचायत गौरव ; तर...

अहमदनगर: राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात सन २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या...

…तर जागतिक प्रदुषण दूर होण्यास वेळ लागणार नाही – प्राचार्य अरुण गायकवाड ; संगमनेर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा

संगमनेरः वसुंधरेच्या पर्यावरणाची सुरक्षितता व प्रदुषरहीत वातावरण ठेवण्यास सर्व तरुणांनी सहभागी होणे आवश्यक आहे. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,...

रुग्णांना दिलासा : खासगी रुग्णालयातील कोरोना उपचारासाठी दर निश्चित ; जाणून घ्या कोणत्या शहरात किती शुल्क लागणार

मुंबई - खाजगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार आणि उर्वरित...