Thursday, January 28, 2021

नगर परिषदेचा कारभार महिलांच्या हाती

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर नगर परिषदेच्या सन 2020 – 2021 वर्षाकरिता विविध विषयांच्या समित्यांच्या सभापती पदाची निवड नुकतीच करण्यात आली. महिलांना या निवडीत मोठे स्थान देण्यात आल्याने पालिकेचा सर्व कारभार आता महिलांच्या हाती एकवटला आहे. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.


याप्रसंगी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे , उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, पक्षप्रतोद विश्‍वासराव मुर्तडक ज्येष्ठ नगरसेवक दिलीपराव पुंड, तसेच नगरसेवका सौ. सोनाली शिंदे, रूपाली औटी, सुनंदाताई दिघे, बाळासाहेब पवार, शबाना बेपारी, आरीफ देशमुख, नूरमुहम्मद शेख, किशोर पवार, सुहासिनी गुंजाळ, मनिषा भळगट, नितीन अभंग, प्रियंका भरीतकर, राजेंद्र वाकचौरे, मालतीताई डाके, नसीम बानो पठाण, हिरालाल पगडाल, वृषाली भडांगे तसेच मुख्याधिकारी सचिन बांगर आदि उपस्थित होते.

यावेळी सौ.सुनंदाताई दिघे यांची सार्वजनिक बांधकाम समितीपदी, सौ. मनीषा बळकट यांची स्वच्छत, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीपदी, सौ. मालतीताई डाके यांची पाणी पुरवठा सभापती, शबाना बेपारी यांची महिला व बालकल्याण समितीपदी, सौ. सुहासिनी गुंजाळ यांची महिला व बालकल्याण समितीपदी, वृषाली भडांगे यांची शिक्षण समितापदी, कुंदन लहामगे यांची नियोजन आणि विकास समितापी तसेच स्थायी समिती सदस्यपदी दिलीपराव पुंड, विश्‍वास मुर्तडक, नसीमबानो पठाण यांची निवड झाली. यावेळी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सभापतींनी पदभार घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

तळेगाव जवळील जंगलाला भीषण आग !!!

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...