Wednesday, March 3, 2021

अमिताभ बच्चन, अक्षयकुमारचे शूटींग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू ; नाना पटोले यांचा इशारा

मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅस दरांमध्ये प्रचंड मोठी वाढ केली आहे. आज पेट्रोल १०० रुपये लिटर तर घरगुती गॅस सिलेंडर ८०० रुपये एवढा महाग झाला असून सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. मोदी सरकारविरोधात लोक संताप व्यक्त करत आहेत. केंद्रात काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना पेट्रोलच्या दरवाढीविरोधात अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून सरकारवर टीका केली होती. मात्र आज युपीए सरकारवेळी असलेल्या दरापेक्षा मोठी दरवाढ झाली असतानाही हे सेलिब्रिटी मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपाच्या इशाऱ्यावर टिव टिव करणाऱ्या अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यांचे चित्रपटांचे शूटींग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भंडाऱ्यात आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार हे लोकशाही मार्गाने चालणारे, संविधानावर चालणारे सरकार होते. त्यामुळेच अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह असंख्य सेलिब्रिटी सरकार विरोधातही आवाज उठवत होते. आज या मंडळींनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे अपेक्षित असताना ते भाजपाच्या हातचे बाहुले बनले आहेत. महागाई, शेतकऱ्यांवरील अत्याचाराविरोधात आता सेलिब्रिटी बोलत नाहीत म्हणूनच काँग्रेसने या भाजपाच्या पोपटांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगभरातील सेलिब्रिटींनी पाठिंबा देताच या सेलिब्रिटींना ट्विट करून मोदी सरकारची तळी उचलण्याचे काम केले. ८५ दिवसापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत आंदोलन करत आहे. भारतीय जनता पार्टी, भाजपाचा आयटी सेल यांनी या आंदोलनाला खलिस्तानी, नक्षलवादी, दहशतवादी म्हणून बदनाम केले त्यावेळीही या सेलिब्रिटींनी मौन पाळले. परंतु भाजपाच्या आयटी सेलच्या सांगण्यावरून त्यांनी शेतकरीविरोधी ट्विट केले. हे सेलिब्रिटी भाजपाच्या आयटी सेलचे पोपट आहेत का? असा सवालही पटोले यांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...