Thursday, January 28, 2021

जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भास्करराव दिघे यांचे निधन

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील प्रवरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे आणि भगतसिंग सहकारी दूध उत्पादक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जनसेवा मंडळाचे संगमनेर तालुकाध्यक्ष भास्करराव लक्ष्मणराव दिघे (वय 70) यांचे काल बुधवारी सायंकाळी 10.30 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, चार पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रवरा ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल उर्फ नंदू दिघे तसेच प्रगतशील शेतकरी गिरीश दिघे यांचे ते वडील होते. भास्करराव दिघे हे भास्कर आप्पा या नावाने सर्व संपूर्ण तालुक्यात परिचित होते. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. कोल्हेवाडी येथील विविध संस्था उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व नगर दक्षिणचे विद्यमान खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कुटुंबियांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते.

त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संगमनेर तालुक्यासह कोल्हेवाडी परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली आहे. सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिलेले भास्करराव दिघे यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्यावर कोल्हेवाडी येथील स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दैनिक युवावार्ता परिवाराच्यावतीने भास्कर अप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

तळेगाव जवळील जंगलाला भीषण आग !!!

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...