Saturday, May 1, 2021

IPL : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मोठा बदल; संघाचे नाव बदलले

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सीजन एप्रिल-मेमध्ये सुरु होणार आहे.14 व्या सीजनपूर्वी पंजाब संघाने मोठा बदल केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब अशा काही संघांपैकी एक आहे ज्याला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. परंतु 14 व्या सीजनपूर्वी पंजाब संघाने मोठा बदल केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले नाव बदलले असून इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सीजनमध्ये ‘पंजाब किंग्ज‘ म्हणून ओळखली जाईल.


गेल्या मोसमात दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आठ आयपीएल संघांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा समावेश होता. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पंजाबचा संघ बर्‍याच काळापासून नाव बदलण्याचा विचार करत होता. आयपीएलचा सीजन सुरु होण्यापूर्वी हे करणे योग्य होईल. संघाचं नाव बदलण्याचा हा निर्णय अचानक घेतलेला नाही.
पंजाबचा संघ मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्या मालकीचा आहे. मात्र संघाला एकदादेखील आयपीएल जिंकता आलेलं नाही. संघ एका सीजनमध्ये उपविजेत होता आणि एकदा तिसऱ्या स्थानावर होता.


लिलावाच्या अगदी आधी किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघाच्या नावात बदल केला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया होणार आहे. गेल्या मोसमानंतर पंजाब संघाने मॅक्सवेलसह अनेक बड्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडे खेळाडूंवर बोली लावण्यासाठी 50 कोटींपेक्षा जास्त रक्कम आहेत. पंजाब संघाने मात्र या मोसमात टॉप लीडरशीपमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नव्या सत्रात संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे राहतील. याशिवाय केएल राहुलच्या नेतृत्वात हा संघ नवीन मोसमात खेळेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,904चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज...

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण...

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.शारीरिकदृष्ट्या...

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...