
ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मॉरिसनं भारताच्या युवराज सिंहचा विक्रम मोडीत काढला आहे. युवराजला दिल्लीनं १६ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. २०२१ च्या आयपीएल लिलावात ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. ७५ लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी संघमालकांमध्ये रस्सीखेच झाली.

आरसीबी, चेन्नई, पंजाब आणि राजस्थान या संघानं ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला. मात्र, राजस्थान संघानं १६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत आपल्या संघात घेतलं आहे. ख्रिस मॉरिसनं गतवर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना ९ सामन्यात ११ बळी घेतले होते. गेल्या आयपीएलच्या लिलावत मॉरिसला १० कोटी रुपयांत आरसीबीनं खरेदी केलं होतं. मात्र, यंदा आरसीबीनं मॉरिसला करारमुक्त केलं होतं.
अष्टपैलू शिवम दुबेसाठी ५० लाखांची होती मूळ किंमत. राजस्थानच्या संघाने ४.४० कोटींच्या रकमेला घेतलं विकत
गेल्या वर्षी बंगळुरू संघात असणारा अनुभवी फिरकीपटू मोईन अली २ कोटींची मूळ किमत असलेल्या अलीला धोनीच्या चेन्नईने त्याला ७ कोटींच्या बोलीला विकत घेतलं.

वर्षभराची क्रिकेटबंदी भोगून आलेला अनुभवी शाकिब अल हसन लिलावाच्या मैदानात प्रभावी ठरला.
कोलकाताच्या संघाने त्याला ३ कोटी २० लाखांची बोली लावून विकत घेतलं.
गेल्या वर्षीच्या IPLमध्ये टीकेचे लक्ष्य ठरलेला मराठमोळा फलंदाज केदार जाधव याला चेन्नईने करारमुक्त केले होते.लिलावादरम्यान त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे तो UNSOLD राहिला.
पंजाब संघाने ग्लेन मॅक्सवेलला करारमुक्त केलं तेव्हा त्याला लिलावात फारसं महत्व मिळणार नाही अशी शक्यता होती. पण त्याच्यावर तगडी बोली लावली गेली. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात रंगलेल्या स्पर्धेत अखेर १४.२५ कोटींना बंगळुरूने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

मुंबई इंडियन्सला पहिल्या सत्रात एकही गडी विकत घेता आला नव्हता.
पण दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज एडम मिल्न याला मुंबईने ३ कोटी २० लाखांना विकत घेतलं.
ऑस्ट्रेलियाचा किपर अलेक्स कॅरी, इंग्लंडचा सॅम बिलिंग्स आणि श्रीलंकेचा अष्टपैलू कुसल परेरा तिघे राहिले UNSOLD
सध्या टी २० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला फलंदाज डेव्हिड मलान मूळ किमत असलेल्या १.५० कोटींना पंजाब किंग्ज संघात दाखल झाला.
ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार आरोन फिंच, भारताचा मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी देखील UNSOLD राहिले.
२ कोटी २० लाखांच्या किमतीला स्टीव्ह स्मिथ दिल्लीच्या संघात दाखल२ कोटींच्या मूळ किमतीला त्याला विकत घेण्यात बंगळुरूने रस दाखवला होता, पण दिल्लीने लगेच २ कोटी २० लाखांच्या बोलीला त्याला खरेदी केले.
इंग्लंडचा दमदार सलामीवीर जेसन रॉय UNSOLD राहिला.त्याला २ कोटीच्या मूळ किमतीला कोणीही विकत घेण्यात रस दाखवला नाही.
इंग्लंडचा वरच्या फळीतील फलंदाज अलेक्स हेल्स UNSOLDत्याची मूळ किंमत १.५० कोटी होती. पण त्याला कोणीही विकत घेतले नाही.
लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाल्यावर पहिलाच खेळाडू भारताचा करूण नायर होता. त्याची मूळ किंमत ५० लाख होती.त्याला कोणीही खरेदी केले नाही. त्यामुळे तो UNSOLD राहिला.

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा एक कोटींच्या बोलीत दिल्लीच्या संघात दाखल झाला.
बंगळुरूने त्याला करारमुक्त केलं होतं.
मुंबईने नॅथन कुल्टर नाइलला करारमुक्त केलं होतं.
यंदाच्या लिलावात पुन्हा मुंबईनेच त्याला ५ कोटींना संघात विकत घेतलं.
झाय रिचर्डसनवर तब्बल १४ कोटींची बोली
दीड कोटींची मूळ किंमत असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याच्यावर अनपेक्षितपणे मोठी लागली. बंगळुरू आणि पंजाब यांच्यात बोलीची चांगलीच रस्सीखेच रंगली होती. अखेर १४ कोटींना रिचर्ड़सन पंजाबच्या संघात गेला.