Thursday, January 28, 2021

कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश ; विहारी-अश्विनने झुंजविले

विहारी अश्विनणे यशस्वी झुंज देत निर्णायक भागीदारी केली

सिडनी: जखमी हनुमा विहारी आणि आर अश्विन या दोघांनी केलेल्या बचावात्मक फलंदाजीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले. पाचव्या दिवशी भारती संघाला विजयासाठी ३०९ धावांची गरज होती. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या भागिदारीने भारताच्या विजयाची आशा निर्माण केली होती. पण ही जोडी बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि आर अश्विन यांनी साडेतीन तासाहून अधिक वेळ आणि २५० हून अधिक चेंडू खेळून सामना वाचवला. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत.

पाचव्या दिवशी भारताने कालच्या २ बाद ९८ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मैदानावर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे फलंदाज होते. कालच्या धावसंख्येत सहा धावांची भर टाकल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला. कर्णधार रहाणे ४ धावा करून बाद झाला. त्याला नाथन लायनने बाद केले. त्यानंतर हनुमा विहारीच्या आधी ऋषभ पंत फलंदाजीला आला. भारताच्या डावातील ही महत्त्वाची घटना ठरली. पंतने पुजारासह चौथ्या विकेटसाठी १४८ धावांची भागिदारी केली. पंत आणि पुजाराने पहिल्या सत्रात भारताचे पारडे जड केले. भारत हा सामना वाचवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी खेळत आहे हे पंत-पुजारीच्या भागिदारीने दाखवून दिले. दुसऱ्या सत्रात पंत शतकाच्या जवळ आल्यावर बाद झाला. लायनने ९७ धावांवर त्याची विकेट घेतली. त्याने ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारासह ९७ धावा केल्या.

पंत बाद झाल्यानंतर पुजाराने अर्धशतक पूर्ण केले. तो आणि विहारी चांगली भागिदारी करतील असे वाटत असतानाच जोश हेजलवुडने पुजाराची बोल्ड काढली. पुजारा ७७ धावांवर बाद झाला. भारताची अवस्था ५ बाद २७२ होती आणि मैदानावर हनुमा विहारी- आर अश्विन ही जोडी होती.

सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाच विकेट तर भारताला १३७ धावांची गरज होती. अशात विहारीला दुखापत झाली. विराहीला वेगाने धावा काढता येत नसल्याने या दोन्ही फलंदाजांनी बचाव तंत्र वापरले. भारताला ३० षटकात विजयासाठी ११८ धावांची गरज होती. पण फलंदाजी करणारे हे अखेरची फलंदाज असल्याने भारताने विजया पेक्षा सामना वाचवण्याकडे भर दिला. या दोघांनी साडेतीन तास आणि २५० हून अधिक चेंडू खेळले आणि सामना वाचवला. भारताने दुसऱ्या डावात ५ बाद ३२४ धावा केल्या. विहारीने १६१ चेंडूत नाबाद २३ तर आर अश्विनने १२८ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या.

ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी दुखापतीनंतरही आपल्या खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं. तिसऱ्या कसोटीतील भारतीय संघाची परिस्थिती पाहून दोघांनीही एखाद्या योध्याप्रमाणे तग धरत कांगारुच्या भेदक माऱ्यास यशस्वी झुंज दिली.

दोन्ही संघातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना १५ जानेवारीपासून ब्रिसबन येथे खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव- सर्वबाद ३३८ (स्मिथ-१३१, जडेजा-४ विकेट)
भारत पहिला डाव- सर्वबाद २४४ (गिल-५०, कमिन्स-४ विकेट)
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव- ६ बाद ३१२ (ग्रीन-८४, सैनी- २ विकेट)
भारत दुसरा डाव- ५ बाद ३३४ (पंत-९७, हेजलवूड – २ विकेट)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...

भांडणाला वैतागून मुलाने केला बापाचा खून ; आरोपीस अटक

घारगाव (प्रतिनिधी)घरघुती किरकोळ वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाला ठार मारल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा येथून काही...