Thursday, January 28, 2021

भारत विजयाच्या उंबरठ्यावर – तिसरा दिवस गाजवला गोलंदाजांनी

अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांच्या १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतानं ३२ धावांत ५ विकेट्स गमावल्या. टीम इंडियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला आणि त्यांनी १३१ धावांची आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर जाण्यास भाग पाडले. उमेश यादव ८व्या षटकात माघारी परतूनही अजिंक्यनं अन्य गोलंदाजांचा सुरेख वापर करताना टीम इंडियाला विजयाच्या दिशेनं कूच करून दिली. जडेजानं गोलंदाजीतही मोठं योगदान दिलं. ७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजिंक्यला माघारी जावं लागलं. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद १३३ धावा केल्या आणि २ धावांची आघाडी घेतली.
भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज
आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

यानंतर टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाही. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जो बर्न्स वाचला, परंतु उमेश यादवनं अप्रतिम चेंडू टाकून त्याला तंबूत पाठवले. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स ( ४) यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बर्न्सनं या निर्णयाविरोधात DRS घेतला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ८व्या षटकात उमेश यादवच्या पोटरीला दुखापत झाली अन् त्याला मैदान सोडावे लागले. भारतासाठी हा मोठा धक्का होता, परंतु अन्य गोलंदाजांची सुरेख कामगिरी केली. जसप्रीत बुमराहनं ऑसींना मोठा धक्का देताना स्टीव्हन स्मिथला ( ८) त्रिफळा उडवला. त्यानंतर वेड आणि ट्रॅव्हिस हेड यांची सेट होऊ पाहिलेली जोडी रवींद्र जडेजानं तोडली. जडेजानं वेडला ( ४० धावा) पायचीत केले. मोहम्मद सिराजनं ऑसीला धक्का देताना ट्रॅव्हिस हेडला ( १७) बाद केले. जडेजानं ऑसी कर्णधार टीम पेनला ( १) माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिले. मैदानावरील पंचांनी पेनला नाबाद दिले होते, पण स्लीपमध्ये उभा असलेला अजिंक्यला तो बाद असल्याचा आत्मविश्वास होता. त्यान लगेच DRS घेतला आणि भारताला यश आलं. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना झुंजवले. पॅट कमिन्स आणि कॅमेरून ग्रीन यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद ३४ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद १३३ धावा केल्या आणि २ धावांची आघाडी घेतली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

तळेगाव जवळील जंगलाला भीषण आग !!!

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...