Thursday, January 28, 2021

कासारा दुमाला शाळेचे बेकायदा बांधकाम – नागरीकांची शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार

संगमनेर (प्रतिनिधी)
तालुक्यातील कासारा दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुनी इमारत पाडून नविन इमारतीचे काम सुरू आहे. मात्र हे काम करतांना तत्कालीन मुख्यध्यापीका व शाळा व्यवस्थापन समितीने जागेचे कोणतेही मोजमाप न घेता चुकीच्या पद्धतीने व स्थानिक नागरीकांना त्रास होईल अशा पद्धतीने बांधकाम केले आहे. या जागेवर काही जणांचे अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण न काढता व शासकीय मोजणी न करता हे बांधकाम केले असल्याने काही नागरीकांनी या बाबत जिल्हा परिषद अध्यक्षा त्याच बरोबर शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करून हे बांधकाम थांबविण्याची मागणी केली आहे.


जिल्हा परिषद शाळेची इमारत जुनी झाल्याने ती पाडून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हे करतांना स्थानिक नागरीकांनी शाळेच्या जागेची शासकीय मोजणी करून घ्यावी व त्यावरील अतिक्रमण काढून घ्यावे अशी मागणी केली होती. मात्र गावातील नाते -गोत्यांचे राजकारण व त्याचा तत्कालीन मुख्यध्यापिकेवर असणारा प्रभाव यामुळे शाळेच्या हिताकडे दुर्लक्ष करून परस्पर ही शाळा पाडून टाकण्यात आली व नविन काम सुरू केले. शाळा पाडतांनी व नविन बांधकाम करतांनी कोणत्याही प्रकारे निविदा न काढता परस्पर मर्जीतील ठेकेदाराला हे काम देऊन हे बांधकाम सुरू करण्यात आले.

मंजूर निधी खर्च करण्याच्या नादात शाळेच्या लहान मुलांच्या आरोग्याचा, खेळण्याचा दिर्घकालीन विचार न करता चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आले. पुर्वीच्या खोल्यांपेक्षा नव्याने बांधलेल्या खोल्या छोट्या आहेत. शाळेभोवती कंपाऊंड न करता शाळेच्या खिडक्या स्थानिक नागरीकांच्या घरासमोर काढण्यात आल्या आहे. संकटकालीन रस्ताही अरूंद रस्त्यावर काढण्यात आला आहे. 60 ते 70 फुट उंचीवर असलेली पाण्याची टाकी शाळेच्या खोलीलगतच आली आहे. भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. भुकंप व इतर नैसर्गीक अपत्तीत या शाळेला लगेच हानी पोहचू शकते अशा पद्धतीने या शाळेचे बांधकाम करण्यात आले आहे. बांधकामासाठी वाळू ऐवजी कच वापरण्यात आलेली आहे. सदर बांधकामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी दत्तात्रय देवकर या तक्रार दाराने निवदेनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

तळेगाव जवळील जंगलाला भीषण आग !!!

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...