Wednesday, March 3, 2021

ICC World Test Championship : अंतिम सामन्याचे चित्र पुन्हा बदलले; भारताला टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठणे किचकट

ICC World Test Championship : चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील शर्यत आणखीन रंजक बनली आहे. चेन्नई कसोटी जिंकल्यानंतर इंग्लंडचे आता 70.2 टक्के गुण झाले आहेत आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर भारत पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका खूप खास आहे. कारण या मालिकेतून, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध कोणता संघ खेळणार हे कळेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेचा निकाल या दोन संघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे भवितव्य निश्चित करेल.

…अन भारत होऊ शकतो क्वालिफाय
इंग्लंडविरुद्धची पहिला कसोटी सामना भारताने मोठ्या फरकाने गमावला आहे. पण तरीही भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळू शकेल. जर इंग्लंडविरुद्धच्या सुरु असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका भारत 2-1 किंवा 3-1 ने जिंकली तर भारताचं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचं तिकीट पक्क असेल.

…आणि भारत बाहेर
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताने एकच सामना गमावल्यास आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडेल. याचाच अर्थ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित तीन कसोटी सामन्यांपैकी कमीतकमी दोन कसोटी सामने जिंकून आणि एक ड्रॉ करावा लागणार आहे.

…इंग्लंडला अंतिम सामन्यात जाण्यासाठी
दुसरीकडे इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जायचे असेल तर त्यांना भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका 3-0, 3-1 किंवा 4-0 अशी जिंकावी लागणार आहे. म्हणजे इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले पाहिजेत.

मालिका ड्रॉ झाल्यास…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचं तिकिट मिळवण्यासाठी भारत आणि इंग्लंड मालिकेवर ऑस्ट्रेलियाचंही लक्ष आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका 1-1 किंवा 2-2 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...