Sunday, April 11, 2021

सुज्ञ नागरिकांना नम्र आवाहन…!

डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी, संगमनेर

डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी, संगमनेर

कधीतरी अंगात बारीक ताप येतो, मनात शंका येऊन जाते की आपल्याला कोरोनाची लागण झाली की काय? पण दुसर्‍याच क्षणी आपण ती नाकारतो आणि मग सुरू होतोशोध कारणांचा… काल जरा उन्हात फिरलो, पाणी बदलले, वातावरण गरम/गार झाले, जास्त काम झाले, काल फॅन खाली झोपलो, झोपच झाली नाही, खिडकी उघडी राहिली, आईस्क्रीम/कुल्फी खाल्ली, ऋतू बदलला त्यामुळे मला 1/2 महिन्यात असे होतच असते. हे आणि असे अनेक कारणांची जुळवाजुळव करत आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण दवाखाना गाठतो खरा पण तोवर आपली पूर्ण खात्री पटलेली असते की आपल्याला तसलं काही नाही म्हणजे कोरोनासारखे…

डॉक्टर दरवाज्यातच हटकतो मास्क का नाही घातला तर आपल्याला राग येतो. आपण रागात खिशात ठेवलेला मास्क लावत आत्तापर्यंत लावलेला असल्याची ग्वाही देतो, मग आपण डॉक्टरला लक्षणे सांगीतल्याबरोबर तो पहिली शंका कोरोनाची घेतो आणि त्यानुसार प्रश्‍न विचारायला लागतो. हे आपल्या लगेच लक्षात येते आणि मग आपण पूर्ण ताकद लावतो. आपल्याला कोरोना कसा झालेला नाही हे पटवून देण्यासाठी. वरील कारणांबरोबरच आपण कशी स्वतःची / कुटुंबाची काळजी घेतो, कसं गर्दीत जाणं टाळतो, कसं ीरपळींळीरींळेप करतो. इतकी कारणं देतो की डॉक्टरलाही प्रश्‍न पडावा की नेमकं बाहेर गर्दी कोण करतं?, लग्नात कोणती माणसं जातात ? बाजारात फिरणारी, दुकानात, मेन रोडला गर्दी करणारी माणसे नेमकी येतात कुठल्या ग्रहावरून…डॉक्टर आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात पण आपल्या निर्धारापुढे झुकतात. कारण त्यांचे ही पुढचे पेशंट तोवर दोनदा डोकावून गेलेला असतो. मग तो advice मध्ये RTPCR आणि इतर तपासण्या लिहून आणि लक्षणांनुसार औषध देतो.


आपण इंजेक्शन साठी हट्ट करतो डॉक्टर गरजेनुसार देतो किंवा गरज नसल्याचे सांगतो. आणि पुढच्या पेशंट कडे वळतो…आपण घरी येतो, औषधाचे एक दोन टक घेतल्यावर आपल्याला थोडे बरे वाटायला लागते आणि मग आपण डॉक्टर, कोरोनावर संशय घ्यायला लागतो. कोरोना म्हणजे थोतांड, कोरोना म्हणजे डॉक्टरांचे लुबाडायचे धंदे, कोरोना म्हणजे खोटे रिपोर्ट अशा एक ना अनेक गृहीतकांमुळे संशय इतका बळावतो की अनेकदा आपल्याला वेदनामुक्त केलेला डॉक्टर आपल्याला खलनायक वाटायला लागतो.
आपल्यासारख्या अनेकांच्या बाबतीत असं घडतं आणि त्यांचा या रिपवशाळल वरचा विश्‍वास उडतो, पण काहींच्या बाबतीत मात्र…2/3 दिवसात ते स्वतः किंवा घरातले कोणीतरी दुसरं विशेषतः वृद्ध आजारी पडत आणि बघता बघता गंभीर होते प्रसंगी आपल्याला सोडून जाते. आज सर्रास असा प्रकार घडतांना दिसतो. आपण डॉक्टर , शासन, यंत्रणेने दिलेल्या सूचनांची पायमल्ली केली आणि गेला गेला म्हणता म्हणता कोरोना पुन्हा आ वासून उभा राहिला आहे.ज्यांना हे थोतांड वाटतं त्यांनी एकदा तरी ज्याच्या घरातलं कोणीतरी कोरोनाने दगावलं आहे त्यांना भेटावे.


आपण हे लक्षातच घेत नाहीये की हेच या आजाराचे वैशिष्ट्ये आहे की 80-85% लोकांना उपचाराची गरजच पडत नाही किंवा अगदी जुजबी उपचाराने ते बरे होतात. पण हेच लोक कोरोना सर्वदूर पसरवायला कारणीभूत ठरतात आणि कोणीतरी निरपराध त्याचा बळी ठरतो.आजही हॉस्पिटल रुग्णांनी गच्च भरले आहेत. बेड मिळणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. आता तरी भानावर या , तज्ञांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करा. मी तर म्हणेन अगदी सामान्य विज्ञान आहे यात आणि तेच प्रभावी हत्यार आहे कोरोना विरुद्ध लढण्याचे. मास्क वापरा, गर्दी टाळा, हात धुणे, सॅनिटायझर करणे, सकस आहार घ्या. लक्षण दिसल्यास स्वतःला इतरांपासून Isolate करा RTPCR चाचणी तात्काळ करून घ्या . या लेखातून प्रयत्न केला आहे आपण कुठे गाफील रहातो आणि आपल्याला नंतर पश्‍चाताप करण्याशिवाय पर्याय उरत नाही. हे लक्षात आणून देण्याचा.
काळजी घ्या, सुरक्षित रहा ! कारण आपला निष्काळजीपणा मुळे इतर कोणाचे ही नाही फक्त आणि फक्त आपले किंवा आपल्यांचे नुकसान होणार आहे. तमाम नागरिकांना नम्र विनंती आहे की शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे .

दैनिक युवावार्ता, लॉकडाऊन सर्व्हे संगमनेर
✅🔰 संगमनेर लॉकडाऊन सर्व्हे🔰✅
🔰 महाराष्ट्र कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने, सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत. नागरिक पुन्हा निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. यामुळे प्रशासनासमोरचे आव्हान अजून वाढतच आहे.
❓ यावर आपणाला काय वाटते?✅ पुढील संभाव्य धोका ओळखून संगमनेर शहरात आताच कडक लॉकडाऊन लागू करायला हवं का नाही?
⚠️खालील लिंक वर क्लिक करून आपले मत कळवा:
https://www.surveymonkey.com/r/SH7D3N9

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेरात पुर्ण लॉकडाऊन नाही ; परंतू कडक निर्बंध लागू ! शनिवार व रविवार पुर्ण लॉकडाऊन

राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध संगमनेरसाठी लागू असून प्रशासनाने संगमनेरसाठी सध्यातरी कोणतेही वेगळे नियम लागू केलेले...

संगमनेरमधील भयानक घटना ! सरकारी जमीनीची बोगस विक्री…!!!

निर्ढावलेल्या लँड माफीया, सँड माफीयांना लगाम कोण लावणार.बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुणाचा पाठींबा आहे. शासकीय अधिकारी मुद्दाम तर...

नगर जिल्ह्यातील दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद ; वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर:  जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी...

रस्त्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद ; संगमनेर शहर पोलिसांची कामगिरी

संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर व आडमार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सतर्क झालेल्या शहर...

धक्कादायक : संगमनेरात एकाच दिवशी सापडले तब्बल १४८ कोरोना रुग्ण; चिंता वाढली: संगमनेरवर पुन्हा लॉकडाउनची टांगती तलवार

जिल्ह्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दररोज वाढतच आहे. बुधवारी काहिसा दिलासा मिळाल्यानंतर आज गुरुवारी कोरोनाने...