Sunday, April 11, 2021

संगमनेरमध्ये फ्रीस्टाईल मारामारी; तलवार व लोखंडी रॉडने हल्ला ; एकाचे हातपाय फ्रॅक्चर; दहा जणांवर गंभीर गुन्हे दाखल : आरोपी फरार

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात राहणार्‍या फिर्यादी व आरोपींमध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद आहेत. या बाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. या मागील भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादीवर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही फ्रीस्टाईल हाणामारी नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स समोर सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीसांनी दहा जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी योगेश सोमनाथ पोगुल (वय 30, रा. जयजवान चौक, इंदिरानगर) याचे व आरोपी शुभम शिंदे, अमित रहातेकर, धिरज रहातेकर, पंकज दुधे, रवी म्हस्के, अनिल गायकवाड, पप्पू गायकवाड व इतरांसोबत जुने वाद आहेत. या वादातून त्यांच्यात पाच ते सहा महिन्यांपूर्वी प्रचंड हाणामारी झाली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. सोमवारी रात्री फिर्याद योगेश पोगुल हा मालपाणी लॉन्स समोर अक्षय शिंदे याच्या टॅटूच्या दुकानासमोर गेले होते. यावेळी त्या ठिकाणी शुभम शिंदे हा आला. फिर्यादी पोगुल ला पाहुन तो म्हणाला तु इथे काय करतोस? त्यावर पोगुल म्हणला घरी चाललो हे बोलत असताना अचानक शुभम शिंदे याने पोगुल याला जमिनीवर पाडून मारहाण व शिवीगाळ सुरु केली. तु अमीतच्या नादी लागतो काय? आज तुला दाखवतोच. याचवेळी अमीत रहातेकर हा हातात तलवार व आरोपी धिरज रहातेकर, पंकज दुधे, रवी म्हस्के, अनिल गायकवाड, पप्पू गायकवाड व इतर हे हातात लोखंडी रॉड घेऊन तेथे आले. त्यांनी योगेश पोगुल याला मारहाण करत, तु मागील वेळेस वाचला आज मात्र तुला जीवंत सोडणार नाही असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली.

यावेळी शुभम शिंदे हातातील तलवारीने पोगुल याच्या डोक्यावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र याचवेळी पोगुल याने उजवा हात मध्ये घातल्याने तलवारीच्या जाड मुठमुळे पोगुल याचा हात फ्रॅक्चर झाला. त्यानंतर आरोपी शुभम शिंदे व रवी म्हस्के यांनी पोगुल यास खाली पाडले. त्यानंतर धिरज रहातेकर, अनिल गायकवाड, पप्पू गायकवाड यांनी हातातील लोखंडी रॉडने योगेश पोगुल याच्या दोन्ही पायांवर जबरी मारहाण केली त्यामुळे पोगुल याचा डावा पाय फ्रॅक्चर होऊन त्यास गंभीर दुखापत केली. या मारामार्‍या सुरु असताना पोगुल याचे मित्र मदतीला धाऊन आले. मात्र आरोपींनी तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्यांना पिटाळून लावले. जखमी योगेश पोगुलला गंभीर मारहाण करत तुझ्यासह घरच्यांना जाळून ठार करु अशी धमकी देत आरोपी तेथुन पसार झाले. या घटनेनंतर जखमी योगेश पोगुलला शहरातील शेळके अ‍ॅक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, प्रभारी पो.नि. पांडुरंग पवार, सहा.पो.नि. माळी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व आरोपीचा शोध सुरु केला. या भिषण मारहाण प्रकरणी फिर्यादी योगेश पोगुल याच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात वरील सात आरोपींसह इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा रजि. नं. 162/2021, भादंवि कलम 307, 326, 143,147,148,149,504,506 यांसह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसुन पुढील तपास पो.नि. पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. माळी करत आहेत.


संगमनेर शहरात शांत झालेले गँगवार व गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रीय झाल्यासारखी परिस्थिती या घटनेतुन दिसत आहे. थेट तलवारीने भर रस्त्यात हल्ले करणे, पोलीसांना न जुमाणने यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरत आहे. गुंड प्रवृत्तीच्या अशा घटनांवर पोलीसांनी वेळीच अंकुश लावावा अन्यथा असे गँगवार पुढे घडण्याची शक्यता आहे. यातील अनेक जणांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेरात पुर्ण लॉकडाऊन नाही ; परंतू कडक निर्बंध लागू ! शनिवार व रविवार पुर्ण लॉकडाऊन

राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध संगमनेरसाठी लागू असून प्रशासनाने संगमनेरसाठी सध्यातरी कोणतेही वेगळे नियम लागू केलेले...

संगमनेरमधील भयानक घटना ! सरकारी जमीनीची बोगस विक्री…!!!

निर्ढावलेल्या लँड माफीया, सँड माफीयांना लगाम कोण लावणार.बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुणाचा पाठींबा आहे. शासकीय अधिकारी मुद्दाम तर...

नगर जिल्ह्यातील दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद ; वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर:  जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी...

रस्त्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद ; संगमनेर शहर पोलिसांची कामगिरी

संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर व आडमार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सतर्क झालेल्या शहर...

धक्कादायक : संगमनेरात एकाच दिवशी सापडले तब्बल १४८ कोरोना रुग्ण; चिंता वाढली: संगमनेरवर पुन्हा लॉकडाउनची टांगती तलवार

जिल्ह्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दररोज वाढतच आहे. बुधवारी काहिसा दिलासा मिळाल्यानंतर आज गुरुवारी कोरोनाने...