Wednesday, March 3, 2021

फास्टॅग सक्तीने वाहन चालकांमध्ये संताप ; टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांशी वाहन चालकांचे खटके उडून वादावादी

संगमनेर (प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या परिवहन मंत्रालयाने सोमवार (ता. 15) व मंगळवार (ता.16) च्या मध्यरात्रीपासून टोलनाक्यावर फास्टॅग स्टीकर बंधनकारक केले आहे. अद्यापही अशा प्रकारची सुविधा नसलेल्या वाहन धारकांची या सक्तीमुळे त्रेधा उडाली असून, संगमनेर तालुका हद्दीतील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर दुप्पट टोल देताना टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांशी वाहन चालकांचे खटके उडून वादावादी झाली. त्यामुळे या टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.

टोलनाक्यांनी युक्त असलेल्या रस्त्यावरील वाहन कर ( प्रवासी टोल ) भरताना होणारी गर्दी, वाहनांच्या रांगामुळे होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या परिवहन मंत्रालयाने आरएफआयडी तत्वावर चालणार्‍या फास्टॅग स्टीकरची निर्मीती केली आहे. वाहनाच्या चालकासमोरच्या काचेवर लावलेले हे स्टीकर टोलनाक्यावरुन जाताना तेथील स्कॅनरद्वारे संबंधित वाहन धारकाच्या बँक खात्यावरुन टोलची रक्कम आपोआप वर्ग होण्याची व्यवस्था या स्वयंचलित यंत्रणेत आहे. यामुळे टोल भरण्यासाठी होणारी दगदग, सुट्टे पैसे आदींचा ताण कमी होणार आहे. तसेच यामुळे महामार्गावरील वाहनांच्या रांगा कमी होणार आहेत. मध्यरात्रीपासून फास्टॅग सक्तीचा केल्यानंतर हे स्टीकर नसलेल्या वाहनांना नेहमीपेक्षा दुप्पट टोलचा भुर्दंड भरावा लागत आहे.

संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर हीच परिस्थिती उद्भवली आहे. या टोलनाक्याच्या परिसरातील 20 किलोमिटरवरील स्थानिकांनाही याचा फटका बसण्यास सुरवात झाली आहे. स्थानिक व्यवसायीक वाहतूकीच्या वाहनांसाठी टोलनाका प्रशासनाने 285 रुपये मासिक पासची सक्ती केल्याने, स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. किरकोळ कारणांसाठी शहरात दररोज येणे अनिवार्य असल्याने, टोलची सक्ती परवडणारी नाही. फास्टॅग स्टीकर घेतल्यास, आपोआप खात्यावरुन पैसे वर्ग होत असल्याने काय करावे हा प्रश्‍न बाहेर प्रवास करणार्‍या खासगी वाहन धारकांना पडला आहे.


या टोलनाक्यावर मोटारीसाठी 85 ऐवजी 170 तर मालवाहतूकीच्या ट्रकसाठी 280 रुपयांऐवजी 560 रुपये आकारले जात आहेत. तर स्थानिक व्यवसायिक वाहनांकडून अर्ध्या रकमेचा टोल घेतला जात आहे. फास्टॅग विक्रीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात 40 हजार केंद्राद्वारे तसेच टोलनाक्यावर व्यवस्था केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...