अवश्य वाचा


  • Share

नगरपरिषदेचा हिट अ‍ॅक्शन प्लॅन तयार - सौ. दुर्गाताई तांबे

ंगमनेर (प्रतिनिधी ) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियाना अतंर्गत कोट्यावधी बियांचे व लाखो रोपांची लागवड झाली आहे. दिवसोंदिवस वाढत्या तापमानामुळे प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ आहे. यावर वेळीच उपाय योजना नाही केल्यास पुढील पिढ्यांना तापमानाचे व पर्यावरण बिघाडाचे अनेक दुष्परीनामांना सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांना शाळेत जातांना पाठीवर ऑक्सीजन सिलेंडर घेवून जावे लागेल अशी गंभीर स्थिती निर्माण होवू शक्यते. यावर उपाय योजना म्हणून संगमनेर नगर परिषदेने शहरात 25 गार्डन केलेले आहेत. त्यामध्ये झाडे,लॉन, फुलझाडे, ओपन जिम, मुलांची खेळणी अशा विविध सुविधा केल्या आहेत. पुढील 5 वर्षांत 50 ओपन स्पेसचे गार्डन नगर परिषद करणार आहे. तसेच म्हानुटी, नाटकी, म्हाळुंगी, प्रवरा या नद्यांचे किनारे ”हरीतपट्टे ” व शहरातील 15 रस्त्यांना हरीत पट्टे बनविणार आहे. पुढील 10 वर्षांत संगमनेर शहर एक थंड हवेचे ठिकाण होण्यासाठी ”हिट अ‍ॅक्शन प्लॅन ” तयार केला आहे. यामध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, बँका, पतसंस्था, सरकारी कार्यालये, व्यापारी संस्था, मंगल कार्यालये, हॉस्पीटल, खासगी व्यवसायीक, उद्योजक आणि सर्व नागरीकांनी या हिट अ‍ॅण्ड अ‍ॅक्सन प्लॉनमध्ये अतिशय गंभीरतेने सहभाग घ्यायचा आहे. प्रत्येकाने पक्षांसाठी बाहेर पाणी ठेवणे, शहरात वेगवेगळ्याा भागात पाणपोई उघडणे, जवळच्या मोकळ्याा जागेत सप्तपर्णी , उंबर, फायकस, काशिद, रेन्ट्री यासारखे झाडे ट्रीगार्ड लावून वाढवावे. जागा कमी असल्यास फुलांची मोठी कन्हेर, बिट्टी, गावठी कन्हेर यांसारखी झाडे लावावी. व्यक्तीगत सर्वांनी ओल्या कचर्‍यापासून गच्चीवर व अंगणात पसरबाग तयार करावी व आपआपल्या दारांसमोर झाडे, फुलझाडे, लॉन करावे असे ही सौ. तांबे यांनी सांगितले. शहरातील संस्था, वैयक्तीक सर्वांनी या ” हिट अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन प्लॅन ” मध्ये गंभीरपणे भाग घेवून आपले शहर थंड हवेचे ठिकाण बनविण्यास सहभाग घ्यावा असे अवाहन नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.