अवश्य वाचा


  • Share

आश्वी वीज उपकेंद्राला अखेरची घरघर

ंगमनेर (प्रतिनिधी) पाऊस चागला झाल्याने या वर्षी आश्वी व परिसरातील नदी, नाले, तलाव, विहिरी या सर्व पाणी स्त्रोताची पाणी पातळी समाधान कारक असली तरी वीजेच्या अपू-या पूरवठ्यामुळे मात्र येथिल शेतकरी हैराण झाला आहे. प्रवरानदी व उजवा आणि डावा कालव्या अंतर्गत हे उपकेंद्र व सर्व क्षेत्र बागायत व ओलिताखाली बारमही व 2 साखर कारखान्याच्या कॉमनझोन मध्ये भंडारदरा निळंवंडे रोटेश सुरु झाले कि विदयुत मागणीत वाढ होते ओहरलोड सुरु झाला की विज ट्रिप प्रमाण वाढते परिनामी शेतकर्‍याचें विदयुत पंप घरघुती इलेस्ट्रीक वस्तु जळण्याचे प्रमाण वाढते व ग्राहक अघिकारी संघर्ष सुरु होतो आंदोलन मोर्च रास्तारोको उपोषणासारखे हत्यार शेतकरी व ग्राहक वर्ग उपासतो विजेचा नेमका प्रश्न का निर्माण होतो याची माहीती शोधण्याचा प्रयन्त केला असता मोठे वास्तव पुढे आले याबाबत उपकेंद्रात भेट दिली असता येथील कर्मचारी दररोज मृत्यु बरोबरच घेऊन काम करत असल्याचे भयानक चिञ समोर आले संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द वीज उपकेद्रं हे ग्रामिण विभागातील सर्वाधिक वीजग्राहक व वसूलीमध्ये अग्रणी आहे. या उपकेद्रांची स्थापना 1975 साली झाली असून 33 के.व्ही क्षमता असलेले हे केद्रं 20 एम.व्ही.ए. क्षमतेचे आहे. यात एक 10 ए.व्ही. व दोन 5 एम.व्ही. ऐ. चे ट्रान्संफॉरमर असून यातून आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, उंबरी-बाळापूर, शिबलापूर, शेडगाव, पानोडी, वरवंडी, हजारवाडी, चौधरवाडी, पिंपरी-लौकी, चणेगाव, दाढ खुर्द, झरेकाठी, खळी आदि गावानमध्ये विद्युत पूरवठा केला जातो. या उपकेद्रांअतंर्गत घरगुती, व्यापारी, शेतीपंप व अन्य वापरासाठी वीजपूरवठा केला जातो. येथे चौदा हजार विद्युत ग्राहक असून रोहित्रांची संख्या आठशेच्या आसपास आहे. 33 केव्ही क्षमता आहे मात्र येथे बाभळेश्वर केंद्रातुन फक्त 24 केव्ही विदयुत पुरवठा होतो व येथूनच समस्यांची मालिका सुरु होती शेतीला पाणी असुनही विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेती उत्पन्नाला मोठी हाणी होते तर दिवसे-दिवस वीजेची वाढती मागणी लक्षात घेतल्यास येथिल यंत्र सामुग्री कोणत्याही क्षणी बंद पडून भविष्यात परिसरातील वीज पूरवठा खंडीत होण्याचा मोठा धोका बळावला आहे.तर मोठे स्फोट ही होण्याची शक्यता असल्याने वितरण कंपनी कर्मचाच्याचे 30 कुदूंबे व शेजारील 500 लोकांच्या वस्तीला जिवित व वित्त हाणी होईल त्यामुळे आश्वी खुर्द उपकेद्रांची झालेली दुरावस्था पाहता या केद्रांला अखेरची घरघर लागली असल्याचे दिसून येत आहे. ाभळेश्‍वर येथिल वीज वितरण केद्रातून आश्वी खुर्द केद्रांला 33 के.व्ही. क्षमता असताना केवळ 24 के.व्ही ईतका पूरवठा होत असल्याने रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी हि विदयुत यंत्रणा आहे तेथे साक्षात मृत्यु 24 तास वाटच पहात असतो मुख्य लाईन ज्या ठिकाणी जोडल्या आहेत तेथील यंत्रे चाळीस वर्षापासुन तिच आहे विज जोडणी डायरेक्ट केलेली असुन बायपास करुण अल्युनियम तारेने जोड दिला आहेत तर आर्थीगं ची जागा अतिशय धोक्याची असुन ओहरलोड झाला तर जमिनितुन वर 5 फुटापर्यत आगनी ज्वाला बाहेर पडतात तेव्हा मोठी हानी होऊ शकते तर केबल जमिनीतुन पाहीजे त्याही उघडयावर अस्तव्यस्त झालेल्या जर कुठे यंत्राने पेट घेतला तर कर्मचारी स्वताचा जीव वाचप्यासाठी पळालाही तरी केबल मध्ये आडकेल खळी व मांची या ठिकाणी सबस्टेशन होऊनही लोड कमी होत नसल्यामुळे त्याचा काही उपयोग परिसराला झालेला नाही. तर जुनाट झालेली यंत्रना बदलून याठिकाणी 132 के.व्ही सबस्टेशन झाल्यास वीजेचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल. या सबस्टेशनसाठी प्रतापपूर गायरान, आश्वी खुर्द गायरान व शेडगाव येथे प्रशासनाने प्रयत्नं केल्यास मोठी जागा उपलब्ध होऊ शकते. परिसरात विविध ठिकाणी सिगंल फेज, गावठान व शेतीपंपासाठी वीज पुरवठा करणा-या लाईनी वेगवेगळ्या असल्याने व त्या ठिक-ठिकाणी ऐकमेकांना क्रॉस झाल्या असून या लाईनीना या ठिकाणी कोणतेही गार्डीयन नसल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होतो व त्यामुळेच शेडगाव येथिल तरुणाचा यात बळी गेला होता. येथे काम करणा-या कर्मचा-याना प्रशासनाने ग्लब्ज, पकड, बायडींग आदि अत्याधूनिक वस्तूचा पुरवठा केल्यास कर्मचा-याचा जीवीताचा धोका कमी होईल. तर या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची मागील दहा वर्षापासून तरतूद असतानाही ते येथे उपलब्ध न झाल्याने या केद्रांची सुरक्षा आजही रामभरोसेचं आहे. या ठिकाण ची सर्व व्यवस्था व सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी विज पारेष़ण कंपनीची असताना कंपनीने आज तागायत कुठलीही तरतुद केली नाही.