अवश्य वाचा


  • Share

टाहाकरीचा तलाव आटल्याने जणावरांचे हाल

समशेरपूर (प्रतिनिधी) अकोले आढळा विभागातील टहाकारी येथील तलावातुन अवैधरित्या बेसुमार पाणी उपश्यामुळे एैन उन्हाळ्यात हा तलाव कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे जणावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मोठा गंभीर बनला आहे. तलावातील पाणी आटल्याने तलावातील हजारो माश्यांच्या मृत्यू झाला. याला सर्वस्वी गावचे ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचा गलथान कारभार जाबाबदार असल्याचा अरोप ग्रामस्थांनी केला आहे. टहाकारी येथे एका पाणी साठवण तलाव असुन उन्हाळ्यात या तलावात चांगले पाणी असते. त्यामुळे जणावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न व आजुबाजुच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटत असतो. मात्र ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचे या तलावाकडे व त्यातील पाणी उपश्यामुळे तसेच त्यांच्या नियोजनामुळे कधीच लक्ष नसते. त्यामुळे या तलावातुन अवैध रित्या डिझेल पंपाद्वारे मोठा पाणी उपसा सुरू असतोय पर्यायाने या तलावातील पाणी आटले असुन परिसरातील नागरिकांच्या जणावरांना आपली तहाण भागविण्यासाठी शेजारच्या कोंभाळणे गावातील तलावात जाऊन भागवावी लागते. तसेच महिलांनाही धुणे भांड्यांचे व पिण्याच्याही पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते. या अवैध व बेसुमार पाणी उपश्यावर वेळीच बंधन घातले असते तरह आज महिलांवर व जणावरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नसती आता असा अरोप ग्रामस्थांनी केला आहे.