अवश्य वाचा


  • Share

एकसंघ सार्वभौम भारतात जीएसटी कर प्रणाली पुढच्या पिढीला खूपच लाभदायी - सहाय्यक विक्रीकर आयुक्त ए. वाय. हासे

अकोले (प्रतिनिधी) सध्याच्या कर पद्धतीत वस्तूच्या प्रत्येक व्यवहारात टॅक्स लागला जातो आणि जास्त टॅक्स जमा केला जातो. वस्तू आणि सेवा कर म्हणजे जनरली ज्या गोष्टी भौतिकरीत्या तुम्ही बघू शकता आणि विकत घेऊ शकता त्या गोष्टी, वस्तू जसे की, कपडे, परफ्युम, शर्ट इत्यादी ज्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घेता परंतू कायमच्या खरेदी करत नाहीत, त्या सेवा (सर्व्हिस) मध्ये मोडतात. जसे की, हॉटेल, पर्यटन, वाहतूक आदी प्रकार आहेत. वस्तू किंवा सेवा यातली कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही खरेदी करता किंवा वापरता तेव्हा त्याचा कर सरकारला द्यावा लागतो. कर रूपाने वसूल झालेला पैसा सरकारच्या तिजोरीत जातो. सरकार हा पैसा विविध प्रकारच्या विकास कामांना जसे की रस्ते, रोजगार हमी योजना, धरणे यांसारख्या योजनांमध्ये वापरते. म्हणूनच वस्तू आणि सेवा कर कायदा हा भारत सरकारचा सर्वात क्रांतिकारी निर्णय समजला जाणार आहे. या करालाच जी.एस.टी (गुड्स अ‍ॅन्ड सर्व्हिस टॅक्स) म्हणूनही ओळखले जाते. आता आपल्याला जरा कठीण वाटत असेल तरी हा कायदा एकसंघ सार्वभौम भारतीय पुढच्या पिढीला खूपच लाभदायी ठरणारा आहे, असे प्रतिपादन सहाय्यक विक्रीकर आयुक्तए. वाय. हासे ( नगर) यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा विक्रीकर विभाग, अकोले येथील ख्यातनाम कर सल्लागार एस. डी. हासे असोसिएट अ‍ॅन्ड कंपनी आणि व्यापारी असोसिएशन अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ( 21 एप्रिल) दुपारी अकोल्यातील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार सभागृहात जीएसटी कर प्रणाली संबंधी माहिती देण्यासाठी प्रसिद्ध कर सल्लागार एस. डी. हासे यांनी जनजागृती शिबिराचे आयोजन केलेे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर येथील सहाय्यक विक्रीकर आयुक्त ए. वाय. हासे हे होते. या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी अहमदनगर येथील विक्रीकर अधिकारी आर. एम. माने, विक्रीकर अधिकारी संजय चव्हाण, विक्रीकर निरीक्षक महेश आखाडे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक विक्रीकर आयुक्तए. वाय. हासे हे बोलत होते. या शिबिरात मार्गदर्शन करताना अहमदनगर येथील विक्रीकर अधिकारी आर. एम. माने यांनी सांगितले की, गुड अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच वस्तू आणि सेवा कर, म्हणजेच जीएसटी. एकंदरीत जीएसटीमुळे कच्चे मटेरीअल ते ग्राहकापर्यंत वस्तू पोहचवण्यासाठी जी टॅक्स ची चैन होते, ती तुटली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोघेही हा कर एकत्रितपणे वसूल करणार असल्याने त्यातून थेट फायदा हा ग्राहकाला होणार आहे. एक जून पासून लागू करण्यात येणार्‍या जीएसटी कायद्याने ग्राहकाचे पैसे वाचतात. या कर प्रणालीत ग्लोबल विचार करून देशातील जनतेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने कर आकारणी न करता जीएसटी एकत्रित आकारण्यात येणार आहे. नव्या जीएसटी कर प्रणालीचा फायदा जगात भारत एकसंघ व अधिक मजबूत आणि शक्तीशाली बनेल. जीएसटीमुळे एकसंघ भारत जगात महासत्ता होण्याच्या मार्गावर अधिक गतिमान होईल व महासत्ता होण्याच्या मार्गावर अनुकूल वातावरण निर्माण होईल. यावेळी बोलताना विक्रीकर निरीक्षक महेश आखाडे यांनी सांगितले की, भारत एक संघराज्य आहे. म्हणजे देशातील राज्यांचा कारभार हा स्वायत्त चालतो. म्हणून राज्य आणि केंद्र सरकारकडून वेगवेगळा जीएसटी वसूल केला जाईल. सध्या देखील केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळे 18 प्रकारचे कर आकारत आहेत. यापुढे जीएसटीमुळे अशा प्रकारे आकारण्यात येणार्‍या वेगवेगळ्या टॅक्सची चैनिंग बंद होणार आहे. पाहुण्यांचा परिचय चार्टर्ड अकौंटट असिफ शेख यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उद्योजक सचिन देशमुख यांनी केलेे. उपस्थितीतांचे स्वागत कर सल्लागार एस. डी. हासे यांनी केले. प्रास्तविक अकोले येथील उद्योजक डॉ. साहेबराव वैद्य यांनी केलेे. केंद्र व महाराष्ट्र राज्य शासनाकडून नव्यानेच लागू करण्यात अलेल्या जीएसटी कर प्रणाली बाबतच्या चर्चेत उद्योजक विलास आरोटे, रूपेश मेहता, भाऊसाहेब नाईकवाडी, साहेबराव वैद्य, गोरख मालुंजकर, दत्ता वाळुंज यांनी शंका उपस्थित केल्या. यावेळी विचारण्यात आलेल्या विविध प्रकारच्या शंकांचे निरसन उपस्थित विक्रीकर अधिकारी आर. एम. माने व विक्रीकर निरीक्षक महेश आखाडे यांनी केले. रामविलास राठी यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.