अवश्य वाचा


  • Share

अँड.शिवाजी गुळवे यांची दिवानी न्यायाधिशपदी निवड

आश्वी खुर्द (वार्ताहर) संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथिल रहिवासी व राहाता न्यायालयात विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्तां या पदावर कार्यरत असलेले अँड. शिवाजी राधुजी गुळवे याची दिवानी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी या पदावर निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती अँड. शिवाजी गुळवे यांनी कमवा व शिका योजनेतून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात बी.एस.सी. पर्यतं शिक्षण पूर्ण करत नाशिक येथे वकीलीची पदवी संपादन केली आहे. संगमनेर न्यायालयात काम करत असताना त्याची राहाता येथिल न्यायालयात विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्तां पदावर निवड झाली. अँड. शिवाजी गुळवे यांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुबंई येथे परिक्षा देत घवघवीत यक्ष संपादन केले आहे. या यशासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, पद्मश्री विखे पाटील कारखाण्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संचालक अँड. अनिल भोसले, अँड.रामदास शेजुळ आदिनी अभिनदंन केले आहे.