अवश्य वाचा


  • Share

आ.वैभवराव पिचड यांच्या वाढदिवसानिमित्त महिला मेळावा व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

अकोले (प्रतिनिधी) अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मानवाधिकार संघटना नवी दिल्ली अकोले तालुका शाखा यांच्या वतीने अकोले तालुक्याचे आ. वैभवराव पिचड यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.27/04/2017 भव्य महिला मेळावा व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी दिली. जाधव यांनी प्रसिध्दीय दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अकोले तालुक्याचे लोकप्रिय तरुण तडफदार आ. वैभवराव पिचड यांचा 27 एप्रिल 2017 रोजी वाढदिवस असुन या निमित्ताने तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मानवाधिकार संघटना, नवी दिल्ली शाखा अकोले तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवसा निमित्त तालुक्यातील घरेलु कामगार महिला, कष्टकरी, शेतमजुर, विधवा, परितक्त्या व बचत गटातील गरीब महिलांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी भव्य महिला मेळावा व प्रशिक्षण शिबीराचे 27 एप्रिल 2017 रोजी सकाळी 11.00 वा के.बी.दादा सभागृह, अकोले या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मानवाधिकारी संघटनेचे महिलाध्यक्षा व राजूरच्या आदर्श सरपंच सौ.हेमलताताई पिचड आहेत. यावेळी माजी मंत्री मधुकररावजी पिचड, सत्कारपुर्ती आ.वैभवराव पिचड हे ही उपस्थित राहणार असून यावेळी सौ.सुजाताताई देवरे महिला सबलीकरण व सक्षमीकरण विविध योजना, चंद्रकांत चिंचोले कौशल्य विकास योजना, रोजगार व स्वयंरोजगार, राजेंद्र घुगे विविध शासकीय योजना, श्री.गायकवाड शबरी वित्त महामंडळाच्या विविध योजना, पगारे दिशा व दशा, भविष्याची उवल वाट अशा विविध विषयांवर व्याख्याने होणार असून या व्याख्यानास तालुक्यातील सर्व महिला व पुरुषांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे अवाहन मानवाधिकार संघटना नवी दिल्ली अकोले तालुका, यांसह अनेक संघटनांनी यावेळी केले आहे.