अवश्य वाचा


  • Share

अति उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत

संगमनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपूर्वी आग ओकणार्‍या सुर्यामुळे उष्णतेची प्रचंड लाट आली असून या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी 10 नंतरच उन्हाचा मोठा तडाखा बसत असल्याने रस्त्यावर अघोषित संचारबंदी असल्याचे भासत आहे या कडक उन्हामुळे शेतातील पिकांनाही मोठा फटका बसत असून अनेक पिकांवर रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या झळा अधिकच तिव्र होत असल्याने जनजीवन पुर्णता विस्कळीत होत आहे. ग्रामीण भागात तर परिस्थिती अत्यंत भयानक होत असून या उन्हामुळे शेतीचे काम खांळाबलेली आहे. ज्यादा मोबदला देऊनही कामगार मिळानासे झाले आहे. कडक उन्हामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटू लागल्याने फळबागांवर त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. पाण्याअभावी डाळींब, द्राक्षे यांची गोडी कमी होऊ लागली आहे. तर बागा ही सुकू लागल्या आहे. दरम्यान, या तिव्र उन्हामुळे चहा पटर्‍यांच्या जागी आता थंड पेयांची दुकाने थाटली आहे. चहाच्या टपर्‍यावरील गर्दी आता थंड पेयांच्या दुकानात दिसू लागली आहे. यात कडक उन्हामुळे शहरातील बाजारपेठातील व्यवहार थंडावला आहे व दुकाने ओस पडत आहे. नागरीक कामे सकाळी किंवा संध्याकाळी करतांना दिसत आहे. अतिशय महत्वाच्या कामासाठी नागरीक दुपारी रस्त्यावर येत असून उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेताना दिसत आहे. या तिव्र उन्हामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. प्रशासनाच्या वतीने ही नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राणी, पक्षी यांचे ही पाण्यासाठी परवड होत असून त्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन ठिकठिकाणी पाणवठे सुरू केले आहे. तर अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने शहरात कामासाठी येणार्‍या ग्रामीण भागातील नागरीकांसाठी पाणपोईची सुविधा ठिकठिाणी उपलब्ध करून दिली आहे.