अवश्य वाचा


  • Share

निळवंडे कालव्यांच्या निधीसाठी संगमनेरात मोर्चाचे आयोजन

संगमनेर (प्रतिनिधी) उत्तर नगर जिल्ह्यासह दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाचे काम मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी अनेक अडचणींवर मात करुन पुर्ण केले. मात्र मागील तीन वर्षात सध्याच्या सरकारने कालव्यांसाठी अतिशय तुटपुंजा निधी दिला आहे. या कालव्यांसाठी शासनाने तातडीने भरीव निधी देवून कालवे पूर्ण करावे या आग्रही मागणीसाठी रविवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता यशोधन येथून सर्व पक्षीय भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबा ओहोळ व कृती समितीचे विठ्ठलराव घोरपडे यांनी दिली. दुष्काळी भागासाठी वरदान असलेल्या निळवंडे धरणाचे काम अनेक अडचणीतून मार्ग काढत मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पुर्ण केले. या कामी मा. मंत्री मधुकरराव पिचड यांचे मोलाचे सहकार्य झाले. प्रकल्प ग्रस्त नागरीक व अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांचेही सहकार्य लाभले. आमदार थोरात यांच्या पुढाकारातून कौठे कमळेश्‍वर, पिंपळगाव कोंझीरा, गणेशवाडी येथील मोठमोठ्या बोगद्यासह काही भागात कालव्यांची कामे झाली आहेत. मागील तीन वर्षात मात्र सध्याच्या सरकारने दुष्काळग्रस्तांची अवेहलना करत 13 कोटी निधी दिला तर यावर्षी फक्त 46 कोटी दिल्याची घोषणा केली. या कालव्यांच्या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा ही झाला. मात्र मंत्र्यांनी विधानसभेत आश्‍वासने देवून ही कृती झाली नाही. म्हणून लाभ क्षेत्रातील 182 गावांतील सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा शासनाविरुध्द एल्गार मोर्चा रविवार दिनांक 23 एप्रिल 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता यशोधन कार्यालय पासून मार्केट यार्ड, बस स्थानक असा निघणार असून प्रांत कार्यालयावर धडकणार आहे. यावेळी मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे , बाजीराव पा. खेमनर, सौ.दुर्गाताई तांबे, अ‍ॅड.माधवराव कानवडे, शिवाजीराव थोरात, भाऊसाहेब कुटे, रामदास पा.वाघ, रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, शंकरराव खेमनर, अरुण पा. कडू, अजय फटांगरे, लक्ष्मणराव कुटे, सभापती निशाताई कोकणे,कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर वर्पे, नानासाहेब शेळके गंगाधर गमे,बाळासाहेब शेळके, जग्गनाथ लोंढे तसेच डावा व उजवा कालवा कृती समितीचे सर्व सदस्य, जि.प. व पंचायत समिती सदस्य, अमृत उद्योग समुहातील सर्व पदाधिकारी, सर्व पक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना, कृती समितीचे सर्व सदस्य आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या निधी मागणीच्या भव्य मोर्चासाठी 182 गावांतील शेतकर्‍यांसह उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, युवक, महिलांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे अवाहन लाभक्षेत्रातील नागरीक व कालवा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.