अवश्य वाचा


  • Share

महिलेच्या गळ्यातील गंठन चोरले राजापूर रोडवरील घटना

संगमनेर (प्रतिनिधी) शहरालगत असणार्‍या राजापूर रोडवरील हॉटेल दत्तसमोर पायी जाणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठन दोघा अज्ञात चोरट्यांनी पल्सर मोटारसायकलीवरुन येवून ओरबाडत पोबारा केल्याची घटना सोमवार दि. एप्रिल रोजी भरदुपारी .0 वाजता घडली. एकूण 0 हजार रुपये किंमतीचे हे सोन्याचे गंठन होते. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील रंजना श्रीपत नवले ही महिला सोमवारी राजापूर रोडवर असणार्‍या एका मंगल कार्यालयात नातेवाईकाच्या लग्नासाठी पायी जात होती. ती हॉटेल दत्तसमोर आली असता त्याच दरम्यान दोन अनोळखी इसम पल्सर मोटार सायकलीवरुन महिलेजवळ आले आणि महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठन ओरबाडून पोबारा केला. त्यावेळी त्या ठिकाणी असणार्‍या एका जणाने त्यांचा पाठलागही केला. पण ते हाती लागले नाहीत. रंजना नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गंठन चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार हे करत आहेत. संगमनेर शहरात गंठण ओरबडण्याच्या घटना आता नित्यांच्याच झाल्या आहे. चोरटे काही क्षणात येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडून पळून जातात मात्र तपास काही लागत नाही. त्यामुळे महिलांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे.