अवश्य वाचा


  • Share

सातवा वेतन आयोग मागणार्‍यांना भ्रष्टाचार न करण्याची अट का नाही

नगर (प्रतिनिधी) सातवा वेतन आयोग मागणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना भ्रष्टाचार करणार नाही अशी अट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस का घालत नाही असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा काल नगरमध्ये आली होती. यावेळी झालेल्या सभेत आ.बच्चू कडू यांनी मुुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले. शेतकर्‍यांना नियम अटी घातल्या जातात मात्र सरकारी बाबूंना मात्र कोणताही नियम नाही. सहावा आता सातवा वेतन आयोग मागतात मात्र भ्रष्टाचार करणार नाही, कामे नीट करू अशी हमी ते देतात का असा सवाल आ.बच्चू कडू यांनी उपस्थित केला. यावेळी शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीवरून त्यांनी सरकार व विरोधकांनाही खडे बोल सुनावत टिका केली. याप्रसंगी त्यंानी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यावरही कडक शब्दात टिका करत विखे हे खोकेवाले नेते झाले आहेत असे सांगून त्यंानी पंधरा वर्षे शेतकर्‍यांना लुटले ते आता संघर्ष यात्रा काढत आहेत. सरकारवर टिका करत कडू म्हणाले की, कर्जमाफी केली तर आत्महत्या करणार नाही याची हमी कोण घेणार असे विचारणार्‍या फडणविसांनी सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग देतांना तुम्हाला भ्रष्टाचार करता येणार नाही याची हमी घेतली आहे का असे बोल सुनावले. रामदेव बाबांचे औषधे विदेशात जातात, उद्योजकांचीही उत्पादने विदेशात जातात मग शेतकर्‍यांच्या मालालाच निर्यात बंदी का? असा प्रश्‍न त्यांनी यावेळी विचारला. याप्रसंगी अनेक शेतकरी नेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.