अवश्य वाचा


  • Share

मानवाधिकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी दत्ता जाधव

अकोले(प्रतिनिधी) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली च्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.हेमलता पिचड यांनी उत्तर महाराष्ट्र मानवाधिकार संघटन च्या कार्याध्यक्षपदी दत्ता जाधव यांची निवड केली.नाशिक येथे मानवाधिकार पदाधिकारी बैठकीत दत्ता जाधव यांच्या नावाची घोषणा करून कार्यभार सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी मावधिकार संघटन चे लकीभाऊ जाधव, चंद्रकांत चिंचोले, राजेंद्र घुगे, सर्वेश खरात, माहिलाध्यक्षा शीतल विसावे, नलिनी शार्दूल, रोहिणी जाधव, पार्वती लकारिया, सुजाता पवार, आदींसह मानवाधिकार संघटन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. मानवाधिकार च्या राष्ट्रीय अध्यक्षा आपल्या भाषणात म्हणाल्या की, समाजावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात मानवाधिकार संघटन काम करते. स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार, शेतकरी वर्ग, कामगार, दुर्बलांवर होणारे अन्याय यांना वाचा फोडण्यासाठी मानवाधिकार संघटन च्या माध्यमातून सर्वांनी प्रयत्न करावे. मानवाधिकार संघटन च्या सामाजिक योगदानाची दखल सर्व देशाने घेतली पाहिजे असे आदर्शवत काम पदाधिकाऱयांनी करावे. मानवाधिकार संघटन चे नाव खराब होणार नाही याची सर्वांनी दखल घेऊन निस्वार्थी वृत्तीने काम करावे. सर्व पदाधिकार्‍यांना प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून कामाची पद्धती व मावाधिकार संघटन ची ध्येयधोरणे यातून कळण्यास मदत होईल. सर्वांनी प्रशिक्षणास उपस्थित राहावे असेही त्या म्हणाल्या. यावेळी नाशिक विभागाच्या वतीने हेमलता पिचड यांचा सत्कार करण्यात आला.