अवश्य वाचा


  • Share

शासनाच्या गणेशोत्सव स्पर्धेत गणेश मित्रमंडळ जिल्हा व तालुका स्तरावर प्रथम

संगमनेर(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत आयोजित जिल्हा व तालुकास्तरीय गणेश सजावट स्पर्धेत येथील शहरातील गणेश नगर येथील गणेश तरूण मित्र मंडळाने सादर केलेल्या ‘स्त्री भूणहत्त्या’ या सामाजिक व ज्वलंत विषयावरील सजावटीला जिल्हास्तरावरील पहिले व तालुका स्तरावरीलही पहिले असे दोन्ही पुरस्कार मिळाले. नगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात आ. अरूणकाका जगताप यांच्या हस्ते मंडळाला रूपये 1 लाख 25 हजार व स्मृतीचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देण्यात आले. मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते युवानेते मनोज पुंड व आबासाहेब शिंदे यांनी या पुरस्काराचा स्विकार केला. शहरातील गणेशत्सव तसेच नवरात्रोत्सव त्याच बरोबर इतर अनेक सण, उत्सव व धार्मीक कार्यक्रम साजरे केले जातात. गणेशोत्सवामधम्ये केवळ ऐतिहासीक, पौराणीक, किंवा मनोरंजनाचीच सजावट न करता समाजातील ज्वलंत प्रश्‍नाला वाचा फोडण्यासाठी व समाजप्रबोधनासाठी या मंडळाकडून दरवर्षी विविध देखावे सादर केले जात आहे. मागील वर्षी स्त्री भ्रुणहत्या हा समाजाला भेडसावणारा प्रश्‍न या मंडळाने केला. राज्य शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागाने सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धा सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत येथील गणेश मंडळाला जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांकाचे (रूपये 1 लाख) तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे (रू 25 हजार) असे दोन्ही पुरस्कार प्राप्त झाले. गणेश मित्रमंडळाला गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हा व तालुका स्तरीय असे दोन्हीही पुरस्कार मिळल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, माजी नगराध्यक्ष व मंडळाचे मार्गदर्शक दिलीपराव पुंड यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत मंडळाला मिळालेल्या या यशाबद्दल मंडळाचे जेष्ठ कार्याकर्ते मनोज पुंड, प्रतिक जाजू, आबा शिंदे, स्वप्नील पुंड, सचिन पाबळकर कार्तिक जाधव, हरिष भोसले सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळेच या मंडळाला व पर्यायाने संगमनेरला हा बहूमान मिळाला आहे.