अवश्य वाचा


  • Share

प्रतिथयश उद्योजक रावसाहेब येवले यांचे निधन

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर व अकोले तालुक्यातील प्रतिथयश अभियंता व उद्योजक एस.के. येवले या कंपनीचे संचालक, ग्लोबल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंजि. रावसाहेब कारभारी येवले यांचे हृदयविकाराने आज पहाटे निधन झाले. त्यंाच्या निधनाने संगमनेर व अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. इंजि. रावसाहेब येवले यांचा जन्म अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथे झाला. अतिशय संघर्ष करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले व नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतःचा उद्योग उभा केला. एस.के. येवले या कंपनीच्या माध्यमातून संगमनेर, अकोले व अनेक मोठ्या शहरात त्यांनी आपला व्यवसाय वाढविला. केवळ उद्योजक म्हणूनच नाही तर सामाजिक भान व जाण असणारे, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना परिचित होते. व्यवसाय, सामाजिक कार्य, शैक्षणिक काम तसेच धार्मिक कार्य अशा सर्वच क्षेत्रात त्यंानी आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या अकस्मित जाण्याने संगमनेर व अकोले तालुक्यात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर मेहेंुदरी ता. अकोले या त्यांच्या मुळगावी दुपारी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्‍चात तीन भाऊ, बादशहा येवले, शिवाजी येवले, भाऊसाहेब येवले, दोन मुले, अभिजित व तुषार तसेच एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दै. युवावार्ता परिवाराच्या वतीने कै. रावसाहेब कारभारी येवले यांना भावपूर्ण श्रघ्दांजली.