अवश्य वाचा


  • Share

गोळीबार प्रकरणातील कोठडीतून पळालेला आरोपी अखेर जेरबंद

संगंमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहरालगत झालेल्या गोळीबार प्रकरणात जेलमध्ये असतांना पहारेकरी पोलीसांना चकवा देत पळालेल्या वेणुनाथ उर्फ पिंट्या माधव काळे याच्या आखेर पोलीसांनी तालुक्यातील तीगाव परीसरात पाटलाग करून मुसक्या आवळल्या. संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नं.280/2017, भा.द.वी.कलम 307,120 ब, 201, 34 सह आर्म अ‍ॅक्ट 3, 25 मधील अरोपी वेणुनाथ उर्फ पिंट्या माधव काळे (वय.35, रा.माळेगाव हवेली) याला अटक केली होती. तो न्यायलयीन कोठडीत असतांना दि.5 एप्रिल रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास कोठडीतील कचरा बाहेर टाकण्याच्या बहाण्याने पळून गेला होता. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा गुन्हा रजी नं. 84/017, भा.द.वी.कलम 224 दाखल करण्यात आला होता. आरोपी कोठडीतुन पळाल्यामुळे चार पोलीसांना निलंबीतही करण्यात आले होते. त्याच्या शोधासाठी पोलीसांनी त्याची बायको सुजाता काळे, भाऊ बाळासाहेब काळे यांनाही अटक केली होती. जिल्हा पो.अधिक्षक सौरभ त्रिपाटी, अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या पथकाने संगमनेरसह शेजारील सिन्नर, कोपरगाव, रहाता या तालुक्यात सखोल तपास केला. दरम्यान सदर आरोपी वडगाव पान व तीगावच्या दरम्यान असणार्‍या डोंगराच्या परिसरात लपला असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पो.नि ओमासे पो.हे.कॉ. इस्माईल शेख. कॉ. शेरकर, पो.ना. लबडे, पो.कॉ.अंबादास पालवे, बाळासाहेब आहिरे, गाडेकर, धुमाळ यांनी वेशांतर करून आरोपीचा पाटलाग करत अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या.