अवश्य वाचा


  • Share

निळवंडे कालव्यांसाठी तातडीने निधी द्या - आ.थोरात

तळेगांव दिघे (प्रतिनिधी) अनेक अडचणींवर मात करुन आपण धरण पूर्ण केले असून या धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपल्या जिवनाचे ध्येय आहे.मागील तीन वर्षात सध्याच्या सरकारने कालव्यांसाठी अतिशय तुटपुंजा निधी दिला आहे. आता शासनाने तातडीने निळवंडे कालव्यांना भरीव निधी देवून कालवे पूर्ण करावे अशी आग्रही मागणी मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. वडगांव पान येथे निळवंडे कालवे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर सौ.दुर्गाताई तांबे, अ‍ॅड.माधवराव कानवडे, शिवाजीराव थोरात, भाऊसाहेब कुटे, रामदास पा.वाघ, रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, सभापती निशाताई कोकणे, कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर वर्पे, उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, गंगाधर गमे,बाळासाहेब शेळके, दत्ता भालेराव, जि.प. सदस्य महेंद्र गोडगे, आर.एम.कातोरे, अजय फटांगरे, सिताराम राऊत, बाळासाहेब गायकवाड, आर.बी. रहाणे, सौ.शांताबाई खैरे, सौ.पद्माताई थोरात, सौ.बेबी थोरात, साहेबराव गडाख, नवनाथ अरगडे, नितीन अभंग आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आ. थोरात म्हणाले कि, निळवंडे प्रश्‍नावर अनेकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण हे धरण पूर्ण करुन दुष्काळी गावांना पाणी देणे हेच जिवनाचे ध्येय मानले. 1999 मध्ये या धरणासाठी कॅबिनेट ऐवजी पाटबंधारे खात्याची रायमंत्री मागवून घेतले. त्या दिवसांपासून कामाला गती दिली. अनेक अडचणी, आंदोलने, प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्‍न अशा अनेक अडचणींतून मार्ग काढला. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत निळवंडे पॅटर्न राबविला. धरणाच्या भिंती बरोबर कालव्यांच्या कामासाठी पुढाकार घेतला. वैधानिक विकास महामंडळातून दरवर्षी भांडून निधी मिळविला. या सर्व कामी माजीमंत्री मधुकर पिचड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. धरणग्रस्तांना संगमनेर तालुक्यात जमिनी दिल्या. त्यांचे संसार उभे केले.या धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्वांच्या जमिनीवरील प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण उठविले.धरणाच्या कामात 100 टक्के योगदान दिले.वेळप्रसंगी मंत्रीपद,आमदारकी ही पणाला लावले.मोठ मोठ्या बोगद्यांची कामे पूर्ण केली. कौठे कमळेश्‍वर,पिंपळगाव कोंझीरा येथील बोगद्यांसह काही भागात कालव्यांची कामे केली.मागील तीन वर्षात मात्र सध्याच्या सरकारने दुष्काळग्रस्तांची अवेहलनाच केली. मागील वर्षी 13 कोटी तर यावर्षी 46 कोटी दिली म्हणता. मंत्री विधानसभेत आश्‍वासने देतात. पण कृती मात्र होत नाही. कालव्यांप्रश्‍नी राजकारण नको आहे. सर्वांनी एकत्र यावे या कालव्यांच्या कामांसाठी कृती समितीने केलेला पाठपुरावा ही कौतुकास्पद आहे.काही मंडळींना द्वेष भावना पसरविण्याचे काम केले. पण आपण जे केले तेच सांगितले. कधीही कामाची प्रसिध्दी आपण केली नाही.म्हणून कामे पूर्ण झाली आहे.आता मतभेद विसरुन मोठे जनआंदोलन उभारुया. रविवारी 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वा.संगमनेरात भव्य मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. यावेळी आ.डॉ.तांबे म्हणाले कि, निळवंडे धरणाचे जनक असलेल्या आमदार थोरातांनी अनेक अडचणींतून हे धरण पूर्ण केले. अनेकांची मनधरणी केली. कधीही कामाची प्रसिध्दी केली नाही.कालव्यांसाठी सतत पाठपुरावा केला. आजही या कामात ते सर्वात आग्रही आहेत. अनेक धरणग्रस्तांना संगमनेरच्या सहकारी संस्थांमध्ये चांगल्या पगारावर नोकर्‍या दिल्या.पाणी प्रश्‍नी सर्वांना बरोबर घेतले. कधीही राजकारण केले नाही. उजवा व डावा कालवा पूर्ण करुन ते पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी ते कायम कटिबध्द आहे.परंतू काही मंडळी राजकारण करत द्वेषभावना पसरवू पाहत आहे.आता या प्रश्‍नी राजकारण करणार्‍यांना दूर ठेवा.उर्वरित कालवे लवकरात लवकर पूर्ण करुन पाणी मिळावे यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. कृती समितीचे उत्तमराव घोरपडे म्हणाले कि, निळवंडे धरण हे आमदार थोरात यांनी पूर्ण केले असून त्यांनी कायम कृती समितीच्या पाठपुराव्याचे कौतुक केले आहे. कालव्यांप्रश्‍नी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून आता एकत्र येवून या कालव्यांचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश व्हावा तसेच शिर्डीसाठी गोदावरी नदीवरुन पाणा आणावे. कालव्यांच्या निधी मागणीसाठी वेळप्रसंगी नगर जिल्हाधिकारी व नाशिक कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढला जाईल असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. महेंद्र गोडगे म्हणाले कि,निळवंडे धरण हे आमदार थोरातांनी पूर्ण केले पण कधीही कामाची प्रसिध्दी केली नाही. त्यामुळे श्रेय घेण्यासाठी काही मंडळी सरसावले.पण जनता आमदार थोरातांच्या पाठिशी आहे.काहींनी दिंडी काढली,फोटो काढले पण नुसत्या बेगडी प्रसिध्दीने कामे होत नाही.आता जनआंदोलनाची चळवळ उभारावी लागेल गावोगावी ग्रामसभा घेवून मोठया आंदोलनाची दिशा ठरवू असे ही ते म्हणाले. याप्रसंगी अ‍ॅड.माधवराव कानवडे,सौ.पद्माताई थोरात,सचिन दिघे,अवधूत आहेर,दत्तु खुळे,बाळासाहेब गायकवाड,रमेश दिघे,राजेंद्र सोनवणे,नानासाहेब शेळके आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संपतराव डोंगरे, पांडूरंग घुले, सौ.सोनाली शिंदे, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे,भारत मुंगसे, तात्याबा दिघे, बुवाजी पुणेकर, सोमेश्‍वर दिवटे, सुभाष सांगळे, विजय रणमाळे,बाबजी कांदळकर, मोहनराव करंजकर, सुरेश थोरात आदिंसह 182 गावांतील शेतकरी, दुष्काळग्रस्त, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ तर सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी मानले आभार भाऊसाहेब कुटे यांनी मानले.यावेळी लाभक्षेत्रातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.