अवश्य वाचा


  • Share

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

संगमनेर(प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शुक्रवार दि. 14 एप्रिल रोजी होत असून त्या निमित्त संगमनेरात विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती संगमनेर शहर व तालुका यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे पंचशिला मुंबईकर यांचा भव्य संगीत मैफील ऑर्केस्ट्रा होणार आहे. शुक्रवार दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता नागसेन बुद्ध विहार घुलेवाडी येथून मोटारसायकल रॅली निघणार आहे. सायंकाळी 4 वाजता बौद्धविहार पुणा रोड येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. दि.15 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणत देश भक्तीपर गाणी व भिमगीतांची भव्य स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठ प्रथम बक्षीस 3001 रू, द्वितीय बक्षीस 2001 रू, तृतीय बक्षीस 1001 रू, तर उत्तेजनार्थ बक्षीस म्हणुन 5001 रू तसेच विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. बक्षीस वितरण समारंभ शनिवार 15 एप्रिल सायंकाळी 6.00 विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी नामांकीतकीत कलाकाराचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. स्तरी या कार्यक्रमांस नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष राजू खरात, उपाध्यक्ष मंजाबापू साळवे, सचिव प्रविण गायकवाड, खजिनदार प्रकाश वाघमारे, कार्याध्यक्ष दिपक अभंग, दिपक साळवे, दिपक दारोळे, चेतन दारोळे, बापुसाहेब रणधीर,अनिल खर्डे, मोसीन पठाण, सुमित वाघमारे, गणेश भालेराव, भाऊराव बागुल, सोमनाथ भालेराव, कैलास कासार, विजय खरात, विय लंकेश्वर, अजित खरात, सचिन साळवे, बाबा मोकळ, प्रशांत घेगडमल, नितीन घेगडमल, सुनिल रोकडे, सोहेब रंगरेज, संतोष जेधे, उत्तम टपळे, बाळासाहेब जाधव, रवि दिघे, संदिप दळवी, मच्छिंद्र यादव, पप्पु गोडगे, सचिन खाडे, चिवा वाघमारे आदींनी केले आहे.