अवश्य वाचा


  • Share

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटूंबियांचे आ.थोरात यांचेकडून सांत्वन

संगमनेर (प्रतिनिधी) वडगांव लांडगा येथील शेतकरी शांताराम एकनाथ हांडे (वय-35) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या शेतकर्‍याच्या कुटूंबियांची मा.कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट घेवून सांत्वन केले आहे. वडगांव लांडगा येथे मयत शांताराम एकनाथ हांडे यांच्या कुटूंबियांची आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. यावेळी समवेत जि.प कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती अजय फटांगरे,जि.प सदस्य रामहरी कातोरे, विष्णुपंत रहाटळ, बाळासाहेब लांडगे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार थोरात यांनी हांडे यांच्या कुटूंबियांची आस्थेवाईक पणे चौकशी करुन शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन केले. याप्रसंगी ते म्हणाले कि, शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे. मात्र त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे हे मोठे दुर्देव आहे. मात्र सध्याचे सरकार शेतकर्‍यांबाबत उदासीन आहे. राज्यात दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असून सरकारला त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने कर्जमाफी केली पाहिजे. तसेच आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना सर्वेतोपरी जास्तीत जास्त शासकीय मदत मिळावी अशी मागणी करतांना शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करु नये असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शांताराम एकनाथ हांडे यांचे आत्महत्येबाबत हळहळही त्यांनी व्यक्त केली.