अवश्य वाचा


  • Share

दारूबंदी असलेल्या राजूरमध्ये सात लाखांची दारू जप्त

अकोले (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही व गावात दारूबंदी असतांनाही तालुक्यातील राजूर येथे राज्य उत्पादक शुल्क व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाच्या टाकलेल्या छाप्यात सुमारे 7 लाख 24 हजार 160 रूपयांची अवैध दारू या पथकाने जप्त केली. या कारवाईमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील 500 मीटरच्या आतील सर्व दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राजूर ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे गावात पूर्णता दारूबंदी केली आहे. असे असतांनाही राजूर व परिसरात ामोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर ररित्या दारू विक्री होत असल्याचे वेळोवेळी पुढे आहे. दरम्यान राजूरमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूविक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती गुप्त खबर्‍यांमार्फत राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना समजली. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक भाग्यश्री जाधव व गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दारू उत्पादन शुल्क राजूर विभागाचे निरीक्षक युपी बर्डे, कर्मचारी शंकर लवांडे, विपुल कर्पे, विजय पाटोळे, मोहिनी घोडेकर, व्ही.एच. गवांदे, आर.बी. कदम तसेच राजूरचे पोलिस निरीक्षक श्री. जाधव व त्यांचे कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने आज पहाटे 4 च्या सुमारास राजूर परिसरातील एका खडी स्टोन क्रेशन जवळ उभी असलेल्या महिंद्रा कंपनीच्या मॅक्स सवारी क्र. एम.एच. 14 पी. 5028 या वाहनावर छापा टाकला यावेळी या वाहनात विक्रीसाठी नेण्यात येणारी देशी विदेशी दारू व गाडी असा एकूण सात लाख 24 हजार 160 रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला. यावेळी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर दारूबंदी खाली गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास निरीक्षक युपी बर्डे हे करीत आहे. दरम्यान राजूर येथे अनेक वर्षोपासून दारूबंदी आहे मात्र गावात व परिसरात सर्र्‍हासपणे दारू विक्री केली जाते. शेजारी असणार्‍या भंडारदरा परिसरात येणार्‍या पर्यटकांसाठी व स्थानिक नागरीकांसाठी ही दारू उपलब्ध करून दिली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने व पोलिसांनी अनेक वेळा छापेमारी करून येथील अवैध दारू जप्त केली आहे. राजूरमध्ये पकडलेल्या लाखो रूपयंाच्या या दारू साठ्यांमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.