अवश्य वाचा


  • Share

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी प्रशासन सज्ज- सौ.कोकणे

संगमनेर (प्रतिनिधी ) संगमनेर तालुक्यात काही गावांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळल्याने मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने प्रशासनाला प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याने याबाबद अधिक दक्षता घेण्याबाबद कार्यवाही सुरु झाली असून नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन सभापती सौ.निशाताई कोकणे व उपसभापती नवनाथ अरगडे यांनी दिली. तालुक्यात काही गावांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वाईन फ्लू रोखण्याबाबद आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिले आहे. या नुसार पंचायत समितीचे सर्व आरोग्य अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांनी तातडीने आवश्यक खबरदारी घेण्यासाठी पंचायत समिती सभापती,उपसभापती,गटविकास अधिकारी सुरेश शिंदे,आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांनी बैठक घेवून कार्यवाही करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.सातत्याने वातावरणातील तापमानाच्या होत असलेल्या बदलामुळे स्वाईन फ्लूच्या रोगजंतूना पोषक वातावरण ठरत आहे. स्वाईन फ्लूसाठी तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालय सज असून त्यासाठी लागणारा औषधसाठा,व्हेंटीलेटर आदि सामग्री रुग्णालयात उपलब्ध असून संगमनेर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय,घुलेवाडी व साकूर तसेच 10 प्राथमिक आरोग्य केंद्रासह 66 उपकेंद्रामध्ये औषधसाठा सामग्री उपलब्ध ठेवण्यात आलेली आहे.प्रत्येक प्रा.आ.केंद्रात स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.तसेच स्वाईन फ्लूची शंका असल्यास घशातील स्त्रावाचे नमुणे तपासणीसाठीची यंत्रणा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे.ग्रामीण भागात आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत स्वाईन फ्लू संरक्षण करण्यात येत असून संबंधीत रुग्ण आढळून आल्यास त्यास त्वरीत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. डॉ.सुरेश घोलप,तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, अफवांवर विश्‍वास ठेवू नये तसेच शिंकतांना,खोकतांना आपला चेहरा व नाक हातरुमालाने झाकून घ्यावा.साधा खोकला, ताप, सर्दी असला तरी शासकीय रुग्णालयात उपचार करुन घ्यावे. प्रतिकारशक्ती वाढविण्याकामी भरपूर पाणी, सकस आहार, जीवनसत्वे अधिक असलेल्या पालेभायांचा आहारात समावेश करावा असे आवाहन पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांनी केले आहे.