अवश्य वाचा


  • Share

मागणी असेल तेथे प्राधान्याने टँकर सुरू करा - आ. थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुका हा विस्ताराने खुप मोठा आहे. प्रर्जन्य छायेखाली असल्यामुळे पाऊस व पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. प्रशासनाने शासकीय तांत्रिक अडचणी नंतर पूर्ण करा मात्र मागणी असेल तेथे प्राधान्याने पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु करा अशी सूचना महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत. पंचायत समिती येथे पिण्याच्या पाण्याचा टंचाई आढावा व कृषी विभागाच्या खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती सौ.निशाताई कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अजय फटांगरे, बाजीराव पा.खेमनर, रणजितसिंह देशमुख, जि.प.सदस्य भाऊसाहेब कुटे, मिलींद कानवडे, महेंद्र गोडगे,रामहरी कातोरे, सौ.मिराताई शेटे, सिताराम राऊत, सौ.प्रियंका गडगे, शिवाजीराव थोरात, सतिषराव कानवडे, प्रातधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा कृषी अधिकारी पंडीतराव लोणारी, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे आदिंसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आ. थोरात म्हणाले कि, तालुक्यात 171 गावे व 240 वाड्या वस्ती आहे. कमी पावसामुळे काही भागात पाणीटंचाई होत आहे. मागणी व प्रस्तावानंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले पाहिजे. दुष्काळ निवारण कामात प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. शासकीय मंजुर्‍या, तांत्रिक कारणे सांगून पाण्याचे टँकर थांबता कामा नये. मानवी भूमिका ठेवून जनतेला मदत करा. दुष्काळ काळात सर्व ग्रामसेवकांनीही आपल्या जागी पूर्णवेळ हजर राहून जबाबदारीने वागा. तालुक्यात पशुधनाची संख्या मोठी आहे.प्रशासनाने जनावरांच्या पाण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजे. मागेल त्याला रोजगार हमीचे कामे द्या. सध्याचे सरकार फक्त घोषणा करते आहे. एकीकडे सेवेचा अधिकारी सांगताना जनतेला पाणी प्यायला मिळत नाही.सर्व कामे ऑनलाईन सांगतांना अनेक त्रुटी दाखवून नागरिकांना हेलपाटे मारायला लावतात. पिण्याच्या पाण्याच्या कामात तांत्रिक अडचण न दाखवता तातडीने मदत करा. तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सुरळीत व चांगल्या चालतील यासाठी प्रशासनाने काळजी घ्या. येत्या आठ दिवसांत तालुक्यातील पाणी प्रश्‍नाबाबद योग्य कार्यवाही करावी अशी सूचना दिली तर कृषी विभागाला खरीप हंगामात शेतकर्‍यांना दर्जेदार खते व बियाणे मुबलक प्रमाणात मिळतील यासाठी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी ते म्हणाले कि, आपल्या कृषी मंत्री पदाच्या काळात एक लाख शेततळ्याांच्या यशस्वी योजना राबविल्या.सध्याच्या सरकारने मागेल त्याला शेततळे योजना जाहिर केले प्रत्यक्ष शेततळ्याांचे अनुदान ही मिळत नाही. महसूलमंत्रीपदाच्या काळात रायातील टंचाई परिस्थिती यशस्वीरित्या हाताळली.तालुक्यातील टंचाई निवारण हे मॉडेल ठरले होते.दररोज टँकरच्या खेपांचा अहवाल घेवून एखाद्या वाडीवस्तीवर टँकर पोहचला की नाही असा अहवाल घेत होतो.असा अहवाल सुरु केला जाईल असे ही ते म्हणाले. पंडितराव लोणारी म्हणाले कि, कृषी विभागाने अनेक नवीन योजना सुरु केल्या आहेत. मागील वर्षांचे ठिबकचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.येत्या खरीप हंगामात बियाणे व खतांची उणीव निर्माण होणार नाही.तसेच जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. यावेळी विष्णू राहटळ,सुनंदा जोर्वेकर,सौ.रोहिणी निघुते, सौ.बेबीताई थोरात, सदाशिव वाकचौरे, सौ.शांताबाई खैरे, सौ.स्वाती मोरे, सुरेश थोरात, प्रभाकर कांदळकर, दत्तु कोकणे आदिंसह सर्व सरपंच व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.या बैठकीचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी केले तर तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आभार मानले.