अवश्य वाचा


  • Share

पालिकेच्या करवाढीविरोधात भाजी विके्रत्यांचा असहकार

संगमनेर (प्रतिनिधी) ठेकेदारांच्या चढाओढीत शहरातील दैनिक व आठवडे बाजारकरांचा ठेका तब्बल 38 लाख 31 हजाराला एका ठेकेदाराने घेतला. मात्र यात कारण नसतांना सर्वसामान्य शेतकरी व भाजी विक्रेते भरडले गेले. नगरपालिकेने बाजारकरात दुप्पट वाढ केल्याने संतप्त झालेल्या भाजी विके्रत्यंानी मंगळवारी बाजारबंद ठेवून पालिकेवर भव्य मोर्चा काढला होता. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने नेहरू चौक भाजी विक्रेत्यांनी पालिकेशी असहकार आंदोलन करीत बाजारकर भरण्यास स्पष्ट नकार दिला आहे. वाढीव करवाढ रद्द करा व भाजी विक्रेत्यांना सोयी सुविधा द्या तरच येथील व्यापारी बाजार कर भरतील अन्यथा कोणीही बाजार कर भरणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजी विके्रत्यांनी घेतली आहे. पालिकेला विकास कामांसाठी महसूल पाहिजे त्यासाठी पालिकेने शहरातील भाजी विक्रेते, शेतकरी, टपरीधारक, फेरीवाले, मालवाहतूक व रस्त्यांवर बसणार्‍या व्यापार्‍यांकडून बाजार कर वसूल करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून ठेकेदारंाना ठेका दिला. या वर्षी या ठेक्यातून पालिकेला तब्बल 38 लाख 31 हजार रूपये मिळाले. मागील वर्षापेक्षा ही रक्कम जवळपास 13 लाखांपेक्षा अधिक आहे त्यामुळे पालिका खुश असून पालिकेचे उत्तन्न वाढले आहे. मात्र या कराचा बोजा थेट सर्वसामान्य शेतकरी, भाजीविक्रेते, छोटे व्यापारी, हातगाडीवाले यांच्यावर पडला आहे. ठेकेदाराने चढ्या दराने ठेका घेतल्याने गुंतविले पैसे दुप्पट नफ्यासह काढण्यासाठी त्याने बाजारकरात जवळपास दुप्पट वाढ केली. या वाढीला पालिकेतही मान्यता दिली. मात्र या करवाढीमुळे सर्वसामान्य व्यापार्‍यांचे मात्र कंबरेडच मोडले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी पालिकेवर मोर्चा काढून व निवेदन देऊनही पालिकेने त्याची कोणतीही दखल न घेतल्याने अखेर नेहरू चौक भाजी विक्रेत्यंानी या करवाढीविरोधात असहकार आंदोलन छेडले असल्याचे नेहरू चौक भाजी विके्रते संघाचे मार्गदर्शक सुनिल पवार व अध्यक्ष सुनिल ढेरंगे, लखन घोरपडे यांनी सांगितले. जो पर्यंत पालिका भाजी विके्रत्यांच्या न्याय मागण्या मान्य करणार नाही, वाढीव करवाढ रद्द करणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची बाजार कर पावती भरणार नसल्याचे भाजी विके्रत्यांचे म्हणणे आहे. नेहरू चौक भाजी विके्रत्यंानी संघटीत होऊन हे आंदोलन छेडले आहे. इतरत्र बसणारे व्यापारी मात्र ठेकेदारांच्या दांडगाईपुढे नाइलाजस्तव कर भरत आहे. पालिकेने या प्रश्‍नावर समाधानकारक तोडगा काढवा अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांनी केली आहे.