अवश्य वाचा


  • Share

शरद पवारांवरील ‘मळभ’ अखेर हटले

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना भाजप मध्ये मतभेद झाले आणि शिवसेना एनडीएतुन बाहेर पडली. त्यानंतर थेट मध्यरात्री भाजपचे सरकार अजित पवारांच्या मदतीने सत्तेवर आले. या सर्व घडामोडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप सर्वस्तरातून केला जात होता. त्यांची एकूण राजकीय वाटचाल पाहता या घडामोडीला व पडद्यामागच्या हालचालीला शरद पवारांचा हात असल्याची भावना राजकीय जाणकारांबरोबरच सर्वसामान्य जनतेमधून होत होती. मात्र शरद पवार यांनी वारंवार याचा खुलासा करुन याचे स्पष्टीकरण देत या घटनेशी माझा कुठलाही सबंध नाही. अजित पवारांनी बंड केले आहे त्यांना माझा व पक्षाचा पाठिंबा नाही तसेच हे सरकार मी टिकू देणार नाही असे सांगूनही त्यांच्यावर कोणीही भरवसा ठेवत नव्हतं. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर व शरद पवार यांनी घेतलेली ताठर भुमिका मित्रपक्षांना दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी अजित पवारांचे बंड मोडून काढले. त्यामुळे अजित पवारांना माघार घ्यावी लागली आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. कालपर्यंतच्या सर्व घडामोडीला केवळ आणि केवळ शरद पवारच जबाबदार असल्याचे भासविले जात होते व शरद पवार शिवसेनेशी दगाफटका करणार असा अनेकांना विश्‍वास होता मात्र आपल्या शब्दावर ठाम राहत शरद पवारांनी हे सरकार पाडले आणि महाविकासआघाडीच्या नवीन सरकारला जन्म दिला. त्यामुळे त्यांच्यावरील धोकाधडीचे मळभ अखेर आज दूर झाले.