अवश्य वाचा


  • Share

सर्वोच्चच्या दणक्याने भाजप भानावर : पवारांच्या कोंडीने अजितदादा ताळ्यावर; अखेर फडणवीस सरकार कोसळले

मुंबई (प्रतिनिधी) - पुरेशे संख्याबळ नसतानाही फोडाफोडीचे राजकारण करुन भाजपाने रात्रीच्या अंधार सत्ता स्थापन केली. अखेर अल्पमतातील हे सरकार आज कोसळलेच. त्यामुळे राज्यात नवीन सत्ता समीकरण निर्माण होऊन शिवसेना + राष्ट्रवादी काँगे्रस + काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असून या महाविकासआघाडीच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्यात गेले काही दिवस चाललेल्या सत्ता नाट्याचा आज दुसरा अंक झाला. बहुमत नसतानाही भाजपने अजित पवारांना हाताशी धरुन सत्ता स्थापन केली मात्र शरद पवारांनी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांची मोट बांधून ती घट्ट करत महाविकास आघाडीची स्थापना केली. शेवटच्या क्षणापर्यंत बंड पुकारलेल्या अजित पवारांची समजूत काढून त्यात यश मिळविले त्यामुळे आज अखेर अजित दादा पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळले. त्यामुळे महाविकासआघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. या महाविकास आघाडीकडून एकमताने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची नेता म्हणून निवड करण्यात आली आणि त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लवकरच सत्तास्थापन करण्यात येणार आहे.