अवश्य वाचा


  • Share

दुष्काळात आदिवासी शेतकर्‍यांना आधारने दिला आधार

संगमनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हिवरगाव पठारच्या डोंगराळ भागातील गि-हेवाडी, पायारवाडी, सुतारवाडी, दगडसोंडवाडी, कोळेवाडी या आदिवासी वस्तीवरील जनावरं चारा पाण्याच्या टंचाईची झळ सोसत आहेत. यासाठी आधार फाऊंडेशन संगमनेर यांच्यावतीने जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात आला. समन्वयक ललिता दिघे यांनी ही मदतीची संकल्पना मांडली. लगेचच मदत जमा करण्यात आली. आधारचे शिलेदार यात सहभागी झाले. एका शेतकर्‍याची मका विकत घेण्याचे ठरले. मदत गरजूंना पोहोचावी यादृष्टीने गिर्‍हेवाडी हे ठिकाण निवडण्यात आले. ग्रामस्थ मारुती पवार यांच्याशी संपर्क साधून गिर्‍हेवाडीतील शेतकरीही स्वतः उपस्थित राहून त्यांनी मका कापली. आदिवासी वस्तीवरील बांधवांना ही चार्‍याची मदत पोहोच झाली. या मदतीबद्दल शेतकरी बांधवांनी आधारला धन्यवाद दिले. ऐन दुष्काळी परिस्थितीत ही मदत लाख मोलाची असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. आधारचे समन्वयक ललिता दिघे, महादेव अरगडे, सुखदेव इल्हे, बाळासाहेब पिंगळे अनिल कडलग,तान्हाजी आंधळे,विठ्ठल कडुसकर, पी.डी.सोनवणे, सोमनाथ मदने, कृष्णा गवारे, पंडित गुंजाळ, गणेश सांगळे, संतोष टावरे, कविता टावरे, विकास टावरे, ज्ञानेश्‍वर धुमाळ बाळासाहेब भागवत आदिंसह आधारच्या शिलेदारांनी व ग्रामस्थांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.