• Share

पदासाठी थोरातांनी देव पाण्यात घातले: राधाकृष्ण विखेपाटील

प्रवरानगरच्या पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता कार्यक्रमात विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना टीकेचे लक्ष्य केले. विखे म्हणाले की, विरोधी पक्ष नेते पदासाठी काही जण देव पाण्यात घालून बसले आहेत. पद मिळण्यासाठी तेवढे कष्ट घ्यावे लागतात. मागील साडेचार वर्षात आपल्या शेजारचे एकतरी शब्द सरकारच्या विरोधात ‘ब्र’शब्द काढला का ?, माझे काय व्हायचे ते होईल तुम्ही चिंता करू नका, असे खडेबोल सुनावले. राधाकृष्ण विखे म्हणाले की, सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. राज्यामध्ये ४८ मतदारसंघ असताना केवळ नगर दक्षिण मतदार संघाचीच सर्वाधिक चर्चा सुरू आहे. तेथे एकटा सुजय विखे पुरेसा असून, सर्वसामान्य माणसाच्या विकासाचे काम करीत असल्यामुळेच जनता त्याच्या पाठीशी ठाम उभी आहे. भविष्यात तुमच्या चिंता वाढणार आहेत, हे शेजारच्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा विखे यांनी थोरात यांना दिला.