अवश्य वाचा


  • Share

भंडारदरा पाणलोटात दमदार पाऊस

भंडारदरा पाणलोटात पावसाचे दमदार पुर्नरागमन झाले असुन रंधा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे कातळापुर परिसरातील भात खचरे तुडूंब भरून वाहू लागले आहे. भंडारदरा पाणलोटात सध्या दमदार पाऊस कोसळत असल्याने परिसरातील ओढे-नाले वाहू लागले आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे. पावसाच्या या पुर्नरागमनामुळे पर्यटकांची पाऊलेही पुन्हा एकदा येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी वळू लागली आहे. (छाया -विलास तुपे)