अवश्य वाचा


  • Share

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नागरीकांना लवकरच स्वत:चे हक्काचे घर -सौ. तांबे

संगमनेर (प्रतिनिधी) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत समाजातील गरीब व गरजू कुटुंबांना स्वत:ची हक्काची घरे मिळावी यासाठी झालेल्या मिटींगमध्ये याबाबतचा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात येवून सदरची योजनेला गरजूंना लाभ मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळेच ही योजना मंजूर झाली व याबाबतची कार्यवाही सुरु असून लवकरच नागरीकांना स्वत:ची हक्काची घरे देणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर म्हणाले की, संगमनेर नगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सर्वांसाठी घरे या योजनेचे लवकरच सर्वेक्षण करुन लवकरच ही योजना पुर्ण करण्यात येईल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संगमनेर नगरपरिषदेला शासनाकडून 3 हजार घरांची योजना मंजूर झाली असून त्याबाबत नगरपालिकेत प्रधानमंत्री आवास योजना नावाने कक्ष स्थापण करण्यात आला असून लाभार्थी कुटुंबांचा नगरपरिषदेच्या वतीने सर्वेक्षन करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. सदर एजन्सी मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच सर्व्हेक्षण झाल्यानंतर नागरीकांनी सदर बाबत अर्ज व त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नगरपरिषदेत स्थापण केलेल्या कक्षात समक्ष दाखल करावे. खासगी संस्था किंवा व्यक्तीकडून दाखल केलेले अर्ज व आवश्यक असलेल्या कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही. असे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी स्पष्ट केले.