अवश्य वाचा


  • Share

सामाजिक भावनेतून रोटरी-इनरव्हीलचा नववर्षारंभ वृक्षमित्र, रक्तदान श्रेष्ठदान संकल्पना साकारणार

संगमनेर ( प्रतिनिधी)- एक झाड दत्तक घ्या व त्याचे संवर्धन करा ही वृक्षमित्र सकल्पना व रक्तदान श्रेष्ठदान, या उपक्रमाव्दारे नूतन रोटरी वर्ष 2017-18 ची सुरुवात करण्यात आली. माहेश्‍वरी ज्युनिअर महिला मंडळ, निमा, इनरव्हील क्लब संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबविण्यात आले. शिक्षक आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, रोटरीचे अध्यक्ष भूषण नावंदर, वृक्षमित्र उपक्रम प्रकल्प प्रमुख सतिष गुंजाळ, सचिव समीर शहा, इनरव्हीलच्या नवनिर्वाचित अध्यक्षा शुभलक्ष्मी बेलापूरकर, सचिव सपना नावंदर, सुनील कडलग, डॉ.विनायक नागरे, नरेंद्र चांडक, पवनकुमार वर्मा, दीपक मणियार, संजय राठी, दिलीप मालपाणी, साईनाथ साबळे, रविंद्र पवार, ओंकार सोमाणी, प्रसाद बेलापूरकर, डॉ.विकास करंजेकर, अजित काकडे, प्रितेश पोफळे, संकेत काजळे, कैलास शेळके, सतिष भंडारी, सुनील शिंदे, निमाचे पदाधिकारी रविन चांडक, डॉ.सुभाष मंडलिक, डॉ.योगेश भुतडा, रोहीत कासट, इनरव्हीलच्या अश्‍विनी राठी, मनोरमा साबळे, सुनिता गाडे, नेहा सराफ, गौरी जोशी, माहेश्‍वरी ज्युनिअर महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदना भंडारी, सचिव शिल्पा झंवर, ज्योती पवार आदी उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनवर भाषणात आ.सुधीर तांबे यांनी रक्तदान, वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन चळवळीत समाजिक संस्था मोठे योगदान देवू शकतात असे सांगीतले. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर शहराला सामाजिक व सांस्कृतिक वारसा व भान आहे. स्वच्छ व सुंदर संगमनेरबरोबरच हरीत संगमनेरचे स्वप्न सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या बळावर साकार होईल. मी संगमनेरचा नागरीक आहे असे प्रत्येकजण त्यावेळी अभिमानाने सांगेल, त्यासाठी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, रोटरी इनरव्हील, निमा व माहेश्‍वरी ज्युनिअर मंडळ या संस्थांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिव समीर शहा तर आभारप्रदर्शन प्रकल्पप्रमुख सतिष गुंजाळ यांनी केलेे.