अवश्य वाचा


  • Share

...यापुढे कर्जफेड करणार नाही निमगावजाळी ग्रामसभेत शेतकर्‍यांचा ठराव

निमगावजाळी (वार्ताहार) राज्य सरकारच्या कर्जमाफी धारणाचा निमगाव जाळी गावात विशेष ग्रामसभेत आज निषेध करण्यात आला. मार्च 2017 पर्यंतच्या कर्जदार शेतकर्‍यांचा सात बारा कोरा करावा, तसे न झाल्यास नेहमित कर्ज फेड करणारे शेतकरी यापुढे कोणत्याही बँकेचे कर्ज भरणार नाही असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील शेतकर्‍यांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी उपसरपंच अमोल जोंधळे होते. यावेळी टि.पी.जोंधळे यांनी माहिती देतांना सांगितले की, 30 जून 2016 अखेर थकबाकीदार असणार्‍याला कर्ज मागणी देण्याचा निर्णय घेतला परंतु निमगाव जाळी गावात थकबाकी असणारे शेतकरी कमी आहे. व 30 जून 2017 अखेर थकबाकीदार शेतकरी जास्त आहेत. तसेच पॉली+हाऊससाठी लोकांनी राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेतले आहे. निमगावजाळी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्जदार सभासद 655 आहेत 31 मार्च 2017 अखेर चार कोटी एकसष्ट लाख एकवीस हजर (461.21) थकबाकी असून कर्ज माफीत फक्त 37 शेतकरी बसतात. त्याचे 15 लाख 39 हजार इतके माफ होतात. व त्यात काही मयत आहेत. सरकारच्या असा दोरणामुे नियमीत कर्जफेड करणारे शेतकरी दुखावले आहे. मार्च 2017 पर्यंतच्या कर्जदार शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करावा व शेतीमालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी या ठरावात करण्यात आली. कोणीही कर्ज भरू नये अशा घोषणा देण्यात येऊन कर्ज माफी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी सरपंच राजेंद्र डेंगळे, सोसाटीचे चेअरमन ठकाजी थेटे, बाळासाहेब आरगडे, बाळासाहेब डेंगळे, संपतराव डेंगळे, सुजाता थेटे नंदु डेंगळे, सनिल डेंगळे, प्रकाश थोरात, भाऊसाहेब डेंगळे यासह अनेक शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.