अवश्य वाचा


  • Share

अशोक पा. खेमनर यांचे दुख:द निधन

संगमनेर ( प्रतिनिधी ) साकुर पठारातील सामाजिक कार्यकर्ते व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्याचे संचालक, जेष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर यांचे सुपुत्र अशोकराव पा. खेमनर यांचे हदय विकाराच्या झटक्याने आज सकाळी 10.30 वाजता दुख: निधन झाले आहे. साकुर येथे आपल्या निवासस्थानी आज सकाळी छातीत दुखु लागल्याने त्यांना तत्काळ संगमनेर येथे कासार हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. परंतु तेथुन ही तातडीने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी नेण्यात येत असतांना त्यांची प्राणयोत मावळली. ही बातमी तालुक्यात पसरतात संपुर्ण तालुक्यासह पठार भागात मोठी शोककळा पसरली आहे. राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक व विश्‍वासु कार्यकर्ते असलेल्या अशोकराव खेमनर यांनी पठार भागात प्रत्येक वाडीवस्तीवरील नागरीकांच्या समस्या सोडविल्या. बाजीराव पा. खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकराव खेमनर व शंकरराव खेमनर या युवा जोडीने कार्यकतृत्वातून मोठा आदर निर्माण केला. अशोकराव गोर -गरीबांच्या प्रत्येक सुख दुखा:त सहभागी झाले. साकुर येथे गोर गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विद्या प्रबोधिनी हे विद्यालय सुरु करुन मोठे विद्याकेंद्र तयार केले. कारखान्याच्या कामकाजात ही अभ्यासपुर्ण लक्ष देवून सहभाग घेतला. आज त्यांच्या अकस्मात निधनाने संपुर्ण अमृत उद्योग समुह व साकुर गांव व तालुक्यात शोककळा पसरली आहे. मृत्यु समयी त्यांचे वय 54 वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात वडील बाजीराव पा. खेमनर, आई, तीन भाऊ, पत्नी मंदाताई, मुले इंद्रजीत, सुजित व मुली आश्‍वीनी व ईश्‍वरी असा मोठा परिवार आहे.