अवश्य वाचा


  • Share

शिवाजीनगर रहिवाश्यांच्या नळांना गटारीचे पाणी - आरोग्य धोक्यात

संगमनेर(प्रतिनिधी) सध्या पावसाळा सुरू असुन या पावसामुळे अगोदरच नळांना गढुळ पाणी येत असुन यात भर म्हणून शहरातील शिवाजीनगर येथील रहिवाश्यांच्या नळांना चक्का गटारीतील दुषिद पाणी येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना गटारीचे पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शिवाजीनगर परिसरात काही वर्षापुर्वी ठेकेदारामार्फत गटारीचे काम करण्यात आले होते. याचदरम्यान नवीन पाईपलाईनही टाकण्यात आली होती. मात्र गटारीमधुनच ही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा प्रताप संबधीत ठेकेदाराने केला. दरम्यान याच पाईपलाईन मधुन अनेकांनी नळ कनेक्शन घेतलेले आहे. यातील काही नळ कनेक्शन खराब झाल्याने त्यात गटरीचे पाणी मिसळले गेले. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांच्या घराला हे गटार मिश्रीत पाण्याचा पुरवठा झाला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून येथील रहिवाश्यांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. या दुषित पाण्याता शोध घेण्यासाठी पाईप लाईन खोदली असता ठेकेदाराचा गलथानपणा व पालिकेचे ढिसाळ नियोजन समोर आले. मात्र त्याचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. गटारीमधूनच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन नेऊन काम वाचवून अधिक नफा कमवणार्‍या या ठेकेदाराच्या कारणाम्यामुळे आज शिवाजीनगर येथिल रहिवाश्यांना गटारीचे पाणी प्यावे लागत आहे. या पाईपलाईनची लवकरच दुरूस्ती करावी अशी मागणी रहिवाश्यांन केली आहे.