अवश्य वाचा


  • Share

निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी

अकोले (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांची भेट घेऊन निळवंडे धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्‍न मांडून चर्चा केली. यावेळी पालकमंत्र्यांना शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात प्रमुख मागणी ज्या प्रकल्पग्रसत्तांना पुनर्वसनात जमीन मिळाली अशा धरणग्रस्तांनी जमिनीच्या किँमतींची रक्कम सरकारला भरावयाची आहे. जोपर्यंत ही रक्कम सरकारकडे भरली जात नाही, तोपर्यंत त्या धरणग्रस्तांचे नाव सात बारा व आठ अ उतार्यावर लावले जात नाही. ती सर्व रक्कम माफ करण्यात यावी, शिर्डी साई बाबा संस्थानमध्ये किमान 20 धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरी मिळावी अशा अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले. पालकमंत्री शिंदे यांनी लवकरात लवकर जलसंपदा मंत्री व पुनर्वसन मंत्री यांचे समवेत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब आभाळे, सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक उपस्थित होते.