अवश्य वाचा


  • Share

पुणे-नाशिक महामार्ग - प्रगतीच्या वेगाला अपघातांची भीती! अपघात टाळण्यासाठी डोंगर-दरडींना संरक्षण जाळ्या बसवण्याची गरज

नाशिक, गुजरात, मध्य प्रदेश व नवी दिल्लीपर्यंत जाणारी वाहने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने पुढे जातात. दररोज 25 हजारांहून अधिक वाहने या रस्त्याने ये-जा करतात. विशेषतः अवजड वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ब-याच वेळा ही वाहने रस्त्याच्या कडेला डोंगराजवळ असलेल्या ढाबा व हॉटेलजवळ थांबतात. एरवी पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लहान वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते अचानक पावसाच्या पाण्यामुळे ओल धरून बसलेल्या दरडी कमजोर पडल्यास त्या रस्त्यावर पडू शकतात एकदा अपघात घडून त्यात मृत्यु ओढावू शकतो त्यामुळे अशा दरडी कोसळणा-या अनेक पॉईंटजवळ संरक्षण जाळ्या असणे गरजेचे आहे. काही ठिकाणी या जाळ्या बसविण्यात आल्या मात्र त्याची संख्या पुरेसी नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात दरडी कोसळ्यापूर्वी सदर ठिकाणी अवधान केंद्रित करून संरक्षण जाळया बसवल्यास एखादा अपघात त्यातून वाचवता येवू शकतो.