अवश्य वाचा


  • Share

‘स्वच्छ व सुंदर संगमनेर’ची तहसिल परिसरात दुर्दशा

संगमनेर नगरपालिका एकीकडे स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर करण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र शहराची ओळख असणार्‍या नूतन तहसिल कार्यालय व शहर पोलिस स्टेशन आवारातच मोठ्या प्रमाणावर कचरा उघड्यावर पडलेला असतो. ठेकेदाराकडून वेळेवर हा कचरा उचलला जात नसल्याने या कचर्‍यावर मोकाट जनावरे, कुत्रे, डुकरे दिक्कतपणे चरत असतात. त्यामुळे येणार्‍या- जाणार्‍या पादचार्‍यांना त्याचा मोठा त्रास होत असतो. या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून या शासकीय इमारतीची शोभा नष्ट होत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे पालीका प्रशासन तसेच तहसिल पोलिस प्रशासनाचेही कोणतेही लक्ष नसल्याचे दिसत आहे.