अवश्य वाचा


  • Share

आश्‍वी पोलिसांची दमदार कामगिरी संयशित म्हणून पकडलेल्या चोरट्यांकडून बारा दुचाकी जप्त

आश्‍वी (प्रतिनिधी) आश्‍वी परिसरासह उत्तर नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हैदोस घालणार्‍या चोरट्यांच्या टोळीला आश्‍वी पोलिसांनी सोमवारी कनकापूर परिसरात दरोड्याच्या तयारीत असतांना संशयित म्हणून अटक केली होती. त्यानंतर त्यांना पोलिस खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता या चोरट्यांकडून आश्‍वी पोलिसांनी तब्बल तीन लाख रूपये किंमतीच्या 12 दुचाकी गाड्या जप्त केल्या. आश्‍वी पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, हवालदार एकनाथ बर्वे, संजय मंडलिक, भारत जाधव, होमगार्ड राजेंद्र साळवे व प्रताप वाघ यांनी सोमवारी कनकापूर शिवारातून पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास गणेश बबन सुर्यवंशी (वय 30, रा. हनुमंतगाव ता. राहाता), मारूती सोमनाथ पवार (वय 20), अशोक इंद्रभान माळी (वय 20), सागर शिवदास माळी (वय 19) सर्व राहणार ओझर बुद्रुक ता. संगमनेर यांना दरोड्याच्या तयारीत असताना कनकवरी शिवारातून ताब्यात घेतले होते तर यावेळी संतू उर्फ उंबर्‍या माळी (रा. बारागाव नांदूर, ता. राहूरी) व सोमनाथ श्रीरंग बर्डे (रा. ओझर बुद्रुक, ता. संगमनेर) हे दोघे पोलिसांना हुलकावणी देत पसार झाले. पकडलेल्या चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना पाच दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. संगमनेर क्षेत्राचे पोलिस उपअधिक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यां च्याकडून चारही दरोडेखोरांची कसून चौकशी केली. आरोंपीकडे सापडलेली गाडी ही चोरीची असून गाडी चोरी गेली असल्याची तक्रार नगर एम.आय.डी.सी. येथील पोलीस ठाण्यात दाखल असल्याची मिळाली मिळाली. चव्हाण यांनी आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करत विक्री केलेल्या ठिकाणांची माहिती दिली. चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्ह्यातून अकरा व आरोपीकडील एक अशा बारा दुचाकी हस्तगत करून आश्‍वी पोलिस ठाण्यात आणल्या आहेत. पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, सहा. पो.नि.योगेश कमाले, उपनिरीक्षक सुनिल वसावे, हवालदार एकनाथ बर्वे, पांडूरंग कावरे, संजय मंडलिक, भारत जाधव, कैलास ठोंबरे, रामचंद्र साळुंके, उल्हास नवले, लाटे व गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेवाळे आदी पोलिस कर्मचार्‍यांनी अट्टल चोरट्यांचा पकडून मोठी कामगिरी केली आहे.