अवश्य वाचा


  • Share

जीएसटीने वाढविली धाकधुक- उत्सुकता पोहचली शिगेला!

संगमनेर (प्रतिनिधी) अवघ्या देशाच्या मनात थोडी धाकधुक उत्सुकता आणि याने काय साध्य होणार? कोणाचे भले होणार यासारख्या असंख्य प्रश्‍नांनी गर्दी केली आहे. अर्थातच आपण जीएसटीबद्दल बोलत आहोत. नोटाबंदीच्या धाडसी निर्णयानंतर आता मोदी सरकारच्या कार्यकाळात जीएसटी प्रणालीची अंमलबजावणी होत आहे. 2 दिवसानंतर म्हणजे 1 जुलैपासून जीएसटी प्रणाली अस्तिवात येत आहे. भारताच्या आर्थिक इतिहासातली ही सर्वात मोठी कर सुधारणा असल्याचे बोलले जात आहे. वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी प्रणालीबाबत सर्वच देशवासियांच्या मनात शंका-कुशंकानीही घर केले आहे. जीएसटीमुळे सर्व राज्यांत करांचा दर एचक असल्यामुळे आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये तो एकदा भरता येत असल्याने कर पुन्हा-पुन्हा भरण्यासाठीच्या वेळेची बचत होणार आहे. असे असले तरी जीएसटीच्या आव्हानांला सर्वच देशवासियांना व्यापार्‍यांना आणि सरकारला ही सामोरे जायचे आहे. 1 जुलैपासून अप्रत्यक्षकरांच्या अंमलबजावणीत क्रांतीकारी बदल होत आहे. जीएसटीचा मुख्य फायछा मुख्यतः उत्पादकांना होणार आहे. कारण देशभरात कुठेही वस्तू विकली तरी करांच्या दर समान असणार आहे. उत्पादन खर्चात करत नफा हे सर्व गृहीत धरून उत्पादकांना वस्तूची किंमत ठरवता येणार आहे. आतापर्यंत ज्या राज्यात वस्तू स्वस्त तिथे जा वस्तू आणि विका असा प्रकार सर्रास घडत होता. आता सगळीकडे एकच कर असल्याने ठराविक प्रांतामध्ये केंद्रीकरण होणार नाही तर विशिष्ठ भागातच वस्तू स्वस्त राहणार नाहीत त्यामुळे आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादकांना नवनविन शक्कल लढवाव्या लागतील. जीएसटी संदर्भात राज्य सरकार आणि सरकारी नेतृत्व यांच्यात असणारे गैरसमज आता दूर झाले आहेत. दोन्ही सरकारांनी मिळून घेतलेला हा निर्णय असल्याने लोकशाही पध्दतीने त्यांची अंमलबजावणी होत आहे. जीएसटी प्रणालीतून काही चांगले मुद्दे समोर आले आहेत त्यामुळे निश्‍चितच सरकारचे उत्पन्न वाढणार आहे हे वाढीव उत्पन्न केंद्र आणि राज्य सरकारांत वाटले जाईल त्यातून आर्थिक विकासाला अधिक चांगली चालना बसू शकेल. दरम्यान जीएसटीच्या अंमलबजावणीत काही अडथळे देखील बोलून दाखवले जात आहेत. छोटे व्यापारी, कारागीर यांना कर भरण्याची इलेक्ट्रॉनिक पध्दती काहीशी जड जाणार असल्याने त्यांचे प्रबोधन अधिक चांगल्या पध्दतीने केले जावे. कनिष्ठ पातळीवरूनच हे सर्व कर वर जाणार असल्यामुळे त्यांचे प्रशिक्षण गरजेेचे बनले आहे. दरम्यान जीएसटी लागू व्हायला 2 दिवस शिल्लक असल्याने सोने खरेदीसह चैनीच्या महागड्या वस्तू आधीच खरेदी करण्यासाठी ग्राहक राजाची झुंबड उडू लागली आहे. बाजारपेठेत जीएसटीच्या पूर्व संध्येला चैतन्य पसरले आहे.