अवश्य वाचा


  • Share

संगमनेरात गाढवांवरून बेकायदा वाळू वाहतुक

महसुल व पोलीस विभागाच्या कृपा आशिर्वादाने संगमनेर शहरात भल्या पहाटे गाढवांवरून बेकायदेशीरपणे प्रचंड वाळू वाहतुक केली जाते. लाचखोरी, हाप्तेखोरीमुळे या अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील गल्ली बोळातुन जाणारे हे गाढवे नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी महागड्या गाड्यांना घासुन जाता. त्यामुळे अनेक नागरिकांच्या गाड्या खराब झाल्या आहेत. या बेकायदेशीर वाळु वाहतुकीचा बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.